कोरोना बाधितांवर वापरणार नवीन औषध ! केंद्र सरकारने दिली परवानगी

कोरोना बाधितांवर वापरणार नवीन औषध ! केंद्र सरकारने दिली परवानगी

दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रिमंडळाने कोरोना बाधित रूग्णांवर ‘डेक्सामेथासोन’ औषध वापरण्याची परवानगी दिलेली आहे. कोरोना रूग्णांवर ‘मिथाईलप्रेडनिसोलोन’ या औषधाला पर्यायी म्हणून ‘डेक्सामेथासोन’ हे औषध वापरण्याची परवानगी देऊन केंद्रीय आरोग्य मंत्रिमंडळाने उपचार पद्धती मधे बदल केला आहे.

‘डेक्सामेथासोन’ हे औषध कोरोनावर प्रभावी ठरल्याचे यूके मधल्या संशोधनात समजले. जेनेरीक स्टेराॅईड प्रकारचे हे औषध आहे. हे औषध कॅन्सरमधे सुद्धा वापरले जाते.कोरोनाची तीव्र आणि मध्यम लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी हे औषध वापरले जाणार आहे. शिवाय मुख्यतः हे औषध दमा , संधीवाद यासांरख्या आजारांवर वापरले जाते.

‘डेक्सामेथासोन’ हे औषध कोरोनावर प्रभावी ठरत असल्यामुळे त्याचे लवकरातलवकर उत्पादन वाढवून जगभरात उपलब्ध करण्याची गरज असल्याचे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) चे संचालक टेड्रॉंस अ‍ॅड्नॉम गेब्रायझ म्हणाले.

तसेच दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत होणारी वाढ बघून येणार्या संकटासाठी सामोरे जाण्यास राज्य सरकारने आय.सी.यू बरोबरच डाॅक्टरांच्या संख्येत देखील वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे आरोग्यमंत्री जेश टोपे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत