जाऊ दे घट भरण्या यमुनेला ।।२।।
मला रे अडवू नको नंदलाला ।।३।।
नंणद माझी चावट भारी चाड्या चूगल्या सांगेल घरी ।।१।।
जाऊन सांगेल रे नवरयाला ।।२।।
मला रे अडवू नको नंदलाला ।।३।।
पहरा देत माझी सासु माझ्या शेजारी नको रे बसु ।।१।।
कोणीतरी सांगेल सासरयाला ।।२।।
मला रे अडवू नको नंदलाला ।।३।।
सासुरवासनी मी गवळ्याची नार रे जिवाला लावीतोस घोर ।।१।।
जाऊ दे उशीर लावू कशाला ।।२।।
मला रे अडवू नको नंदलाला ।।३।।
सोड जाऊ दे माघारी येते माघ शील ते दान तुला देते ।।१।।
मानो जया गुपीत नको सागुं कोणाला ।।२।।
मला रे अडवू नको नंदलाला ।।३।।
जाऊ दे घट भरण्या यमुनेला ।।२।।
मला रे अडवू नको नंदलाला ।।३।।