होलीचे सोंग घेऊन

होलीचे सोंग घेऊन लाऊ नको लाडीगोडी
रंग नको टाकू माझी भिजेल कोरी साडी
होलीचे सोंग घेऊन
खेळ कृषाचा सागुं नको तू मला
गोडी गोडी ने राहु नको वेगळा
पाठीशी माझ्या येऊन करु नको रे खोडी
रंग नको टाकू माझी भिजेल कोरी साडी
होलीचे सोंग घेऊन
सारी काया तुला हर्पिली मी जरी
तरी का रे तू करसी अशी मस्करी
नादाला तुझ्या लागुन होईन मी रे वेडी
रंग नको टाकू माझी भिजेल कोरी साडी
होलीचे सोंग घेऊन
जाऊदे ना मला पुरे झाली मज्या
जोडते हात मी पाया पडते तुझ्या
ओठाची माझ्या लाली देईन तुजला थोडी
रंग नको टाकू माझी भिजेल कोरी साडी
होलीचे सोंग घेऊन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत