सह्याद्रीच्या कडेकपारी आवाज घूमतो आज ।।२।।
शिवनेरीवर जिजाई पोटी शिवाजी आले आज ।।२।।
मराठी छावा गनिमी कावा ।१।
स्वराजा तो ताज आहे स्वराज तो ताज ।।२।।
शिवनेरीवर जिजाई पोटी शिवाजी आले आज ।।२।।
आई जिजाऊ होती महान ।१।
बाळ तिच्या पोटी आले छान ।।२।।
कर भात उमगली रीत ।१।
नाही कोणाच्या बापाला भीत ।।२।।
पोलादी काया मनात माया ।१।
स्वराज फुलले आज हे स्वराज फुलले आज ।।२।।
शिवनेरीवर जिजाई पोटी शिवाजी आले आज ।।२।।
गुरू लागले तुम्हा दादोजी ।१।
घोड किंडीत पडले बाजी ।।२।।
सोंड हत्तीची कापे यसाजी ।।१।।
तुमच्या पाठीशी होता जिवाजी ।।२।।
अर्पण करुनी देहाची तोरण ।।१।।
काळही कापे आज ।।२।।
शिवनेरीवर जिजाई पोटी शिवाजी आले आज ।।२।।
सर्व मवळ्यानां पोटाशी धारले ।१।
नाही ते माघारी कधी फिरले ।।२।।
स्वारी करुन सुरत लुटले ।१।
पांग धारणी मातेचे फिटले ।।२।।
प्रराकमाचा सागर उसले मराठी मातीत आज ।।२।।
शिवनेरीवर जिजाई पोटी शिवाजी आले आज ।।२।।
शिवरायाचां इतिहास भव्य ।।१।।
आम्हा शिकवण देतो हा दिव्य ।।२।।
जिसू रक्ताच पाणी करु ।१।
गड किल्याचे जतन करु ।।२।।
साक्षीदार तुम्ही इतिसाचे ।१।
मुजरा करतो आज ।।२।।
शिवनेरीवर जिजाई पोटी शिवाजी आले आज ।।२।।
मराठी छावा गनिमी कावा ।१।
स्वराजा तो ताज आहे स्वराज तो ताज ।।२।।
शिवनेरीवर जिजाई पोटी शिवाजी आले आज ।।२।।