स्वयंपाक घरातील काही उपयोगी सल्ले : नक्की पाहा

स्वयंपाक घरातील काही उपयोगी सल्ले : नक्की पाहा

स्वयंपाक घरातील काही उपयोगी सल्ले :

●पकोडे, भजी करताना पिठात कॉर्नफ्लोर टाकावे. त्यामुळे तेल कमी वापरले जाते आणि भजीदेखील कुरकुरीत होतात.
●डोसा किंवा इडलीचे पीठ शिल्लक राहिले असल्यास १/2 हिरव्या मिरच्या टाकून ठेवाव्यात त्यामुळे पीठ आंबट होत नाही.
●डोसा किंवा इडली बनवताना उदीड डाळीबरोबर थोडे पोहे भिजत घालावेत. असे केल्याने इडली नरम होतात.
●तुमच्या फ्रिजमधे वास येत असल्यास लिंबाचे दोन भाग करून फ्रिजमध्ये ठेवा. फ्रिजमधील सर्व नकोसे वास लिंबामुळे शोषले जातात.

हेही वाचा : वेलचीचे सेवन केल्याने शरीराला होतात फायदे.!जाणून घ्या

●कापसाच्या बोळ्यावर थोडा व्हॅनिला इसेन्स टाकून फ्रिजमध्ये ठेवावे. फ्रिजमध्ये मंद सुगंध दरवळत राहतो.
●मिक्सरमध्ये थोडे मीठ घेऊन बारीक वाटावे. त्यामुळे मिक्सरच्या ब्लेडची धार कायम राहते आणि मीठ पण बारीक मिळते.
●दालचिनी किंवा वेलची पूड करताना त्यात थोडी साखर टाकल्याने पूड पटकन होते.
●दुधावरील सायीचे ताक मिक्सरमधून काढल्यास लोणी जास्त निघते व सायीचा चोथा लागत नाही तसेच ताक देखील पातळ होते.
●कांदा भजी करताना बेसनाच्या पिठात पाव प्रमाणात रवा मिसळावा. त्यामुळे भजी कुरकुरीत होतात.
●पावसाळ्यात काडेपेटीत तांदळाचे ७ ते ८ दाणे टाकून ठेवावेत. काडेपेटय़ा दमट होत नाही.
●दुधाच्या पावडरची पेस्ट करून कुकरमध्ये २ शिटय़ा करून घ्याव्यात म्हणजे गार झाल्यावर खवा तयार होतो.
●इडलीचे पीठ भिजवताना सोडा किंवा बेकिंग पावडरऐवजी कांद्यावरचा पापुद्रा काढून धुवून तो या पिठात बुडवून ठेवा. असे केल्याने पीठ छान आंबते व इडली चांगली हलकी होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत