महाराष्ट्रातील लाॅकडाऊन ३० जून ते ३१ जुलै २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे. परंतु लॉकडाऊनच्या अटी मुख्यत्वे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि अहमदाबाद या मोठ्या शहरांसाठी आहे तशाच समान आहेत. आपल्याला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे ते खालीलप्रमाणे;
एमसीजीएमसह एमएमआर क्षेत्राच्या महानगर पालिकांमधे पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महानगरपालिकांना खालील कामांना निर्बंधासह परवानगी देण्यात आलेली आहेः हेदेखील वाचा : स्वयंपाक घरातील काही उपयोगी सल्ले : नक्की पाहा
लाॅकडाऊनमधे या गोष्टींना सशर्त परवानगी : ●अत्यावश्यक सेवांची दुकाने पूर्वीप्रमानेच सुरू राहतील.
● इतर दुकानेही संबंधित महापालिकांच्या सूचनेनुसार उघडतील.
●आवश्यक आणि इतर गोष्टींची ई-काॅमर्स विक्री.
●औद्योगिक काम सुरू राहतील.
●माॅल आणि मार्केट काॅम्प्लेक्स वगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत उघडतील.
●मद्यदुकाने सुरू करण्यास परवानगी असण्यास उघडतील अन्यथा होम डीलिवरीसाठी परवानगी.
●रेस्टाॅरंट, किचन होम डील्हीवरी करण्यास परवानगी.
●खाजगी आणि सार्वजनिक बांधकाम साईट किंवा मान्सूनपूर्व काम करण्यास परवानगी.
●ऑनलाईन दूर शिक्षणास परवानगी.
●सायकलिंग, रनिंग, वाॅक या सर्व गोष्टींना परवानगी.
●वर्तमानपत्राची छपाई आणि वितरणास परवानगी.
●लग्नासंबंधी कार्यक्रंमासाठी मोकळ्या जागा, लाॅन किंवा नाॅन ए.सी हाॅलमधे घेण्यास परवानगी. १.सरकरी कार्यालये (आपत्कालीन, आरोग्य आणि वैद्यकीय, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस अन्न आणि नागरी पुरवठा वगळता), १५ टक्के किंवा १५ कर्मचारी संख्येने (यापैकी जे अधिक असेल ते) कार्यरत राहतील.
२. १० टक्के किंवा १० कर्मचारी संख्येने (जे जास्त असेल ते) सर्व खासगी कार्यालये सुरू राहतील.
३. टॅक्सी, कॅब, रीक्शा, चारचाकी- केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक + २
दुचाकी- फक्त चालक.
४. प्लबंर, इलेक्ट्रिशियन, अशा तंत्रज्ञ यांनी सोशल डिस्टंन्सिंग, मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करून काम करावे.
गॅरेजची वेळ घेऊन वाहने दुरूस्ती कामे करावीत.
५. शैक्षणिक संस्थाचे कर्मचारी पेपर तपासणे किंवा निकाल जाहीर करणे या कामासाठी प्रवास करू शकतात.
६. केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर, यांना नियम पाळून कार्यरत राहण्याची सवलत.
७.जिल्हांतर्गत बस सेवा ५० टक्के प्रवाशांसह.
८. एमएमआर क्षेत्रांतर्गत आवश्यक काम आणि कार्यालयासाठी आतंरजिल्हा प्रवास.
९ खरेदीसाठी जवळच्या मार्केटमधे जाणे अपेक्षित.
१०. अनावश्यक कामासाठी लांब प्रवास करण्याची मुभा नाही.
११. शक्य तितक्या कर्मचार्यांना वर्क फ्राॅम होम द्यावे.
१२. थर्मल क्लिनींग, हँडवाॅश, सॅनिटायझर, प्रत्येक प्रवेशद्वारासमोर ठेवणे अनिवार्य.
१३. दोन शिफ्टच्या दरम्यान दरवाजे यासांरख्या मानवी स्पर्श होणार्या जागा सॅनिटाईझ कराव्यात.
१४. दोन कर्मचार्यांमधे पुरेसे अंतर राहील, दोन शिफ्ट आणि लंच ब्रेकमधे गर्दी जमणार नाही याची काळजी घ्यावी.