सरोज खान यांचा आत्तापर्यंतचा प्रवासः जाणून घ्या..

सरोज खान यांचा आत्तापर्यंतचा प्रवासः जाणून घ्या..

सरोज खान सुप्रसिद्ध कोरीओग्राफर यांचं शुक्रवारी सकाळी निधन झालं. कार्डीअटॅक मुळे त्यांचं निधन झाले. काही दिवसांपूर्वी श्वास घेताना त्रास होत असल्यामुळे त्यांना गुरू नानक या वांद्रे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती ती निगेटीव्ह आली. परंतु आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवाय त्या मधुमेह सारखे अजून आजार देखील होते. त्या ७१ वर्षाच्या होत्या.

हे देखीव वाचा : १ जुलै पासून बँकांचे दहा नवीन नियम! वाचा

सरोज खान बाॅलीवूड मधल्या नावाजलेल्या कोरीओग्राफर होत्या. २०१९ मध्ये मल्टिस्टारर चित्रपट कलंक आणि कंगना रणोतच्या ‘मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटासाठी एक गाणं कोरिओग्राफ केलं होतं. एक दो तीन, हमको आज कल है इंतजार, यासारख्या अनेक सुपरहीट गाण्यांच त्यांनी कोरीओग्राफी केली होती.तसेच डोला रे डोला, चोली के पिछे क्या हे या गाण्यांचेही कोरीओग्राफी त्यांनी केली होती.

सरोज खान यांनी आत्तापर्यंत तीन वेळा राष्ट्रीय पुर्मस्कार मिळवला. सरोज खान यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून आपल्या करीअर ची सुरूवात केली होती. ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाद्वारे १९७४ मधे त्यांना बॉलिवूडमध्ये संधी मिळाली. दिड हजार पेक्षा जास्त गाणी त्यांनी कोरिओग्राफ केली आहेत. शिवाय काही चित्रपटांमध्ये त्यांनी लेखक म्हणूनही काम केलं होतं.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत