सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अनेक सांस्कृतिक सण रद्द करण्यात आले आहेत. शिवाय काही सण सामाजिक भान राखून साजरा करण्यात आले. दरवर्षी पंढरपूरच्या वारीला लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरला येत असत. पण यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे सर्व नियमांचे पालन करत सोशल डिस्टसिंग राखत काही मोजक्याच श्रेष्ठ संत मंडळींसह पादुका पंढरपूर ला नेण्यात आल्या.
आता मुबंईतला प्रसिद्ध गणेशोत्सव ‘चिंतामणी’ चा यंदाचा १०१ वा गणेशोत्सवाचे दरवर्षीप्रमाणे आगमण सोहळा न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच बरोबर आता चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे.
दरवर्षी प्रमाणे गणेशाची मोठी मूर्ती न आणण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव यंदा धार्मिक पंरपरा राखून मंडळाच्या देव्हार्यातील ‘चांदीच्या मूर्ती’ची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर हा गणेशोत्सव सामाजिक उपक्रमांत साजरा करण्यात येणार आहे.
हेदेखील वाचा : थोडीशी पण उपयोगी माहिती
दोन दिवसांपूर्वीच लालबाग गणेशोत्सव मंडळाने देखील यावर्षीचा गणेशोत्सव साजरा न करता त्याऐवजी ११ दिवस गणेशोत्सवानिमित्त ‘रक्तदान व प्लाझ्मादान शिबीर’ घेण्याचा निर्णय घेतला आहे. सगळया गणेशोत्सव मंडळांनी कोरोनाच्या संचटकाळात सामाजिक भान ठेवल्याचे दिसून येत आहे.