दादर स्टेशन आता आपल्याला एका नव्या रूपात पहायला मिळणार आहे. दादर हे भारतीय लोकलचे केंद्रबिंदू आहे. भारतीय रेल्वे स्टेशन पुनर्विकास महामंडळ आणि दक्षिण कोरियन संयुक्त उद्यम यांच्यात झालेल्या करारामुळे दादर स्थानकात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. स्थानकात ही नवीन भर निश्चितपणे आपला दररोज प्रवास अधिक सुलभ व सोयीस्कर करेल.
राहुल शेवाळे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार यांनी मिड-डे शी बोलताना सांगितले, “बराच वेळ झाल्यावर लवकरच प्रलंबित असलेल्या सामंजस्य करारावर लवकरच सह्या होणे अपेक्षित आहे. दोन स्थानकांमधील अंतर्गत रस्त्याबरोबरच पादचारी क्षेत्र आणि भूयेरी पार्किंग सुविधा उभारण्याची मुख्य योजना आहे. ” प्रकल्प दोन्ही स्टेशन रोडला जास्त कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. प्रकल्पात पादचारी उपमार्ग, भूमिगत आणि व्यावसायिक संकुल देखील समाविष्ट आहेत.
ही योजना बर्याच काळापासून प्रलंबित आहे. आधी होणार होती परंतु लॉकडाऊन व इतर मुद्द्यांमुळे ते उशिरा झाले. एकदा हे काम झाल्यावर डिझाईन्स व इतर घटक निश्चित केले जाऊ शकतात. या प्रकल्पाची एकूण किमंत रूपये ४६० कोटी आहे.
हेदेखील वाचा : मालाड येथील पुष्पा पार्क परीसरात झाला अपघात…
दादर रेल्वे हे मुंबईचे हब आहे आणि दररोज १० लाखाहून अधिक प्रवासी येथून प्रवास करतात. सध्या हे युनिट खूपच विखुरलेले आहे आणि त्यामध्ये दोन स्वतंत्र स्थानके आहेत. जर त्या जागेचा योग्य वापर केला गेला तर, ते शहरी नूतनीकरणाचे केंद्र बनू शकेल.
सहायक सुविधायुक्त एक योग्य स्टेशन युनिट तयार करणे महत्वाचे आहे. शहरातील कनेक्टिव्हिटीचे मुख्य केंद्र दादर आहे.
१० जुलै रोजी या करारावर स्वाक्षरी करण्यात येईल. बातमी सोर्स- मिड-डे.