अख्या जगात कोरोनाने थैमान घातले आहे. तरीही अजून कोरोनावर सर्वगुण संपन्न असे औषध बनवण्यात यश आलेले नाही. त्यातच भारतीय हायड्राॅक्सीक्लोरोक्वीन या मलेरीया वरील आणि लोपिनवीर या एड्स वरील तसेच रीटोनोवीरचे यांचे संयुक्त डोस कोरोना बाधित रूग्णांना द्यायची परवानगी वर्ल्ड हेल्थ आॅरगनायझेशन ने दिली होती.
परंतु या औषधांचा बाकीच्या औषधांच्या तुलनेत काहीही बदल झालेला नाही आहे. उलट पहील्यापेक्षा अधिक मृत्यू होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ही औषधे वापरण्यावर पुन्हा बंदी आणलेली आहे.
हे देखील वाचा – लवकरचं दादर स्टेशन नवे रूप धारण करणार..
एकीकडे कोरोना जगात वेगाने पसरत असता औषधाचा परीणाम न होणे हा मोठा धक्काच बसल्यासारखे आहे. हायड्राॅक्सीक्लोरोक्वीन हे कोरोनावर अतिशय परीणाम कारक औषध असल्याचे कळाल्यावर या औषधावर घातलेली निर्यात बंदी हटवण्यात आली होती. अमेरीकेसह अनेक देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदिंशी संपर्क साधला.
काही दिवसांपूर्वीच ब्रिटेन मधे या औषधाचे कोरोना रूग्णांवर टेस्टींग करून हे औ षध उपयुक्त आहे की नाही याची परवानगी दिली होती. परंतु शनिवारी यावर बंदि घातली अशी माहीती राॅयटर्स या इंटर नेशनल वृत्ताने दिली.
अमेरीकेच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ ने देखील मलेरीयाचे हायड्राॅक्सीक्लोरोक्वीन हे औषध परीणाम कारक नसल्याने क्लिनीकल टेस्टिंगवर बंदी घातली होती.
या आधी देखील या औषधावर छापून आलेल्या लेखामुळे या औषधाच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती.
असे असताना देखील चीनच्या संशोधकांनी म्हटले आहे कि कोरोनामुळे अत्यंत बिकट परीस्थिती असलेल्या रूग्णांचि मृत्यूदर कमी होण्यास मदत झाली आहे.
वृत्तपत्र सोर्स- लोकमत.