भारताचा दिग्गज कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या कारकीर्दीत ज्या गोष्टींची कल्पना केली ते सर्व साध्य केले. धोनीच्या नेतृत्वात भारताने टी -२० विश्वचषक,आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि विश्वचषक जिंकली. एमएस धोनीने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत ९० कसोटी सामने, ३५० वनडे आणि ९८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आपल्या कारकीर्दीत धोनीने अनेक अनोखे विक्रम केले आहेत.
१) सर्वाधिक षटकारांसह सामना संपविणार्या फलंदाजीचा विक्रम
एकदिवसीय क्रिकेटमध्ये बहुतेक वेळा षटकार मारून सामना संपविण्याचा विक्रम हा एमएस धोनी च्या नावावर आहे. धोनीने एकदिवसीय कारकीर्दीत एकूण २२९ षटकार लगावले असून त्यापैकी ९ सामन्यात शेवटचे षटकार मारुन त्याने भारताला जिंकविले आहे.
२) एकदिवसीय सामन्यात खेळल्या गेलेल्या सर्वाधिक नाबाद खेळीचा विक्रम
एमएस धोनी आपल्या वनडे कारकिर्दीतील सर्वात नाबाद खेळी खेळली आहे. एमएस धोनी आतापर्यंत ३५० एकदिवसीय सामन्यात ८४ वेळा नाबाद आहे. धोनी या क्षणी टीम इंडियाच्या बाहेर असला तरी, पाठलाग करताना तो किती उपयुक्त ठरला हे त्याच्या नोंदी सिद्ध करतात. धोनीने वनडेमध्ये १० शतके आणि ७३ अर्धशतके झळकावली आहेत.
३) सर्वात कमी सामना खेळून प्रथम क्रमांकाचे स्थान प्राप्त केले.
सर्वात कमी सामने खेळून प्रथम क्रमांकाचा फलंदाज हे स्थान मिळवण्याचा विक्रम एमएस धोनी च्या नावावर आहे. पहिले ४२ एकदिवसीय सामने खेळल्यानंतरच धोनी प्रथम क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. एमएस धोनीने ५ व्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पहिले शतक झळकावले होते. ५ एप्रिल २००५ रोजी धोनीने पाकिस्तानविरुद्ध वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. पहिल्या एकदिवसीय शतकादरम्यान माहीने १४८ धावांची खेळी केली होती.
४) सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम
एकदिवसीय सामन्यात एमएस धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक शतक ठोकून चमत्कार केले आहेत. एमएसने आपल्या एकदिवसीय सामन्याच्या कारकीर्दीत २, ३ आणि ४ क्रमांकावरही फलंदाजी केली आहे नंतर ६ आणि ७ क्रमांकावर धोनीने फलंदाजीचे स्थान कायम ठेवले. धोनीने सातव्या क्रमांकावर एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके ठोकली आहेत. एमएस धोनी च्या नावावर सातव्या क्रमांकावर २ शतके ठोकण्याचा विक्रम आहे.
५) एकदिवसीय सामन्यात सहाव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
एमएस धोनी एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक सहाव्या क्रमांकावर धावा करणारा फलंदाज आहे. सहाव्या क्रमांकावर धोनीने एकदिवसीय सामन्यात एकूण १२६ डाव खेळले असून या काळात त्याने ४०३१ धावा केल्या आहेत. २०१३ मध्ये धोनीने मोहाली एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १३९ धावा केल्या.