‘दिल बेचारा’ या ट्रेलर मधी हा ‘सिन’ होतो आहे व्हायरल! जाणून घ्या रहस्य..

‘दिल बेचारा’ या ट्रेलर मधी हा ‘सिन’ होतो आहे व्हायरल! जाणून घ्या रहस्य..

सोमवारी सुशांत सिंग राजपूत याच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर रीलकड झाला. सुशांच्या आत्महत्येनंतर २३ दिवस होऊनही त्याच्या आठवणी दूर होत नाहो आहेत. त्यातच दिलासा म्हणून त्याचा ट्रेलर रीलीज झाल्यावर तो जणू आपल्यात नाही असं वाटतचं नाही. दिल बेचारा या सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर रीलीज झाल्या अवघ्या १ तासात ५० लाखांहून अधिक चाहत्यांनी तो ट्रेलर बघितला. आणि २४ तासांच्या आत २.५ कोटींच्या वर व्हिव्ज् पोचले होते. तर आत्तापर्यंतचा यूट्युबवर सर्वात जास्त लाईक मिळवणारा हा ट्रेलर आहे. सुमारे ७.९ कोटी लोकांनी हा विडीओ लाईक केला आहे.
ट्रेलर मधील अनेक डायलाॅग आणि सिन्स व्हायरल झाले आहेत.’जनम कब लेना है और मरना कब है हम डीसाईड नही कर सकते पर कैसे जिना है ये हम डीसाईड कर सकते है.’ या डायलाॅग ने तर चाहत्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. त्यांना सुशांत अगदी चेहर्यासमोर आठवू लागला.

शिवाय या ट्रेलरमधील शेवटचा सिन ज्यामधे सुशांत किज्जी ला म्हणजेच संजना सांघ्वीला तुम मेरी गर्लफ्रेंड अभी नही हो या कभी नहीं असे म्हणतो. या काही सेकंदाच्या सीनमुळे देखील चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत. त्या सीन मधे सुशांत सिंग एका टी-शर्ट वर आहे. त्या टी-शर्ट वर ‘हेल्प’ असे लिहीलेले आहे. सुशांत नेहमी आपल्या टी-शार्ट द्वारे काही ना काही मेसेजेस् देत असतो. या सीन मधील टी-शर्ट द्वारे देखील त्याला मदतीची गरज होती असे चाहत्यांनी पोस्ट्स केले आहे. तो हसत जरी असला तरी त्याला मदतीची गरज होती अशा भावना चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
हा चित्रपट ‘जाॅन बून’ यांच्या ‘द फाॅल्ट इन अवर स्टार्स’ या पुस्तकावर आधारीत आहे. येत्या २४ तारखेला तो हाॅटस्टार वर रीलीज करण्यात येणार असून सबस्क्राइबर तसेच नाॅन सबस्क्राइबर्संना देखील हा पाहता येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत