बाॅलीवूडमधील आणखी एका काॅमेडी अभिनेत्याचे निधन.! वाचा

बाॅलीवूडमधील आणखी एका काॅमेडी अभिनेत्याचे निधन.! वाचा

बॉलीवूध मधील २०२० अनेक दिग्गज अभिनेत्यांच निधन झाल.त्यातच सुरमा भोपाली या बाॅलीवूडमधील अजून एका अभिनेत्याच निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांच निधन झाले आहे. बुधवारी मुबंईमधील बांद्र्याच्या राहत्या घरी रात्री ८.३० वाजता त्यांच निधन झाले असे जगदीप मित्र प्रोड्यूसर मोहम्मद अली यांनी सांगितले.

सुरमा भोपाली या नावाने प्रसिद्ध असलेल्या जगदीश चे खरे नाव सैयद इश्तियाक अहमद जाफरी होते. त्यांचा जन्म मध्यप्रदेश मधील दतिया गावात २९ मार्च १९३९ मधे झाला. एका वकीलाच्या घरात त्यांचा जन्म झाला. वयाने वृद्ध असल्या कारणाने अनेक आजाराने ते पीड़ीत होते. त्यांना ण्क्टरजावेद आणि नावेद जाफरी ही दोन मुल होती.

हे देखिल वाचा : आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले मोठे निर्णय; वाचा

जगदिश काॅमेडीच्या टाइमिंगसाठी जास्त फेमस होते. ४०० पेक्षा जास्त सिनेमांमधे त्यांनी काम केले होते. १९७५ साली आलेल्या ‘शोले’ चित्रपटातील सुरमा भोपाली या किरेदार ने ते बाॅलीवूड मधे फेमस झाले होते. शिवाय सुरमा भोपाली या किरेदार वर सिनेमा देखील बनवण्यात आला त्यात जगदीश यांनीच मुख्य भुमिका निभावली होती.
त्यांनी आपल्या फिल्मी करीअर ची सुरूवात चाईल्ड आर्टीस्ट ‘मास्टर मुन्ना’ च्या रूपात ‘बी आर चोप्रा’ यांच्या ‘अफसाना’ चित्रपटातून केली होती. त्यानंतर त्यांनी चाईल्ड आर्टीस्ट म्हणूनच ‘लैला मजनू’ मधे काम केले. त्यांनी कॉमिक रोल करण्यास ‘दो बीघा जमीन’ या विमल राॅय यांच्या चित्रपटापासून करण्यास सुरूवात केली.
नागिन, ब्रम्हाचारी तसेच अंदाज अपना अपना यांसारख्या चित्रपटातील त्यांची काॅमेडी सगळ्यांना आवडली. ज्या काळात जाॅनी वाॅकर आणि मोहम्मद यांच वर्चस्व होत त्या काळात त्यांनी स्वतःला स्थापित केल होत.

हेदेखील वाचा: बंधपात्रित नर्सेसंना पूर्ण पगार देण्याची मागणी: अमित ठाकरे

बाॅलीवूडमधे २०२० साली अनेकांनी अलविदा केले. त्यात इरफान खान, ऋषि कपूर, संगीतकार वाजिद खान आणि कोरियोग्राफर सरोज खान यासांरखी नावे होती। तसेच अभिनेता सुशांत सिंह राजपूत ने पण मागच्या महीन्यांत आत्महत्या केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत