कोरोनाच्य पार्श्वभूमीवर अनेक सण साजरे करण्यास भेटले नाही. त्याच बरोबर गणपतीचा सण देखील जवळ आला आहे. मुबंईत नोकरीला असलेल्या चाकरमान्यांना गणपती साठी गावी यायचे असेल तर ७ ऑगस्ट रात्री १२ पर्यंतच सिंधूदुर्गात प्रवेश दिला जाईल.
२२ आॅगस्ट रोजी यंदा गणेश चतुर्थी आहे. गणेशचतुर्थी साठी अनेक चाकरमणी ठाणे, मुबंई साबतच अनेक राज्यातीवमल मोठ्यासंख्येने आपल्या मूळगावी जात असत. पण यावेळी कोरोनाच्या संकटामुळे गावी जाता येईल की नाही असा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यावर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज बैठक घेतली त्यात निर्णय घेण्यात आला आहे.
इतर जिल्ह्यांतून सिंधूदुर्ग जिल्ह्यात येणार्या चाकरमान्यांना ७ आॅगस्ट रात्री १२ पर्यंतच प्रवेश दिला जाईल. जिल्ह्यात येण्यासाठी ई-पास ची आवश्यकता. ई-पास नसल्यास प्रवेश देण्यात येणार नाही.
शिवाय अजूनही काही निर्णय घेण्यात आले ते खालीलप्रमाणे आहेत:
● परजिल्ह्यातून आलेल्या नागरीकांना गाव नियंत्रण समीतिच्या सल्ल्याने १४ दिवस क्वारंटाइन राहणे आवश्यक आहे. नागरीकांनी पर जिल्ह्यातून येण्याअगोदर क्वारंटाईन राहण्याकरीता घराच्या क्षमता/सोयी सुविधा आहेत का याची खात्री करूनच यावे. परजिल्ह्यातून आलेल्या नागरीकांना १४ दिवस घराबाहेर पडता येणार नाही. तसेच परजिल्ह्यातून आलेल्या नागरीकांच्या घरातील स्थानिक सदस्यांवर घराबाहेर पडण्याकरीता निर्बंध असतील याची दक्षता घ्यावी.
● गणेशोत्सव २२ ऑगस्ट २०२० रोजी असून गणेशोत्सवाच्या खरेदीकरता ‘मकर, फुले, किराणा माल इ.) बाजारपेठेत गर्दी करू नये आवश्यक त्या गोष्टी आधीच खरेदी करून घ्याव्यात.
●सिंधूदुर्ग जिल्ह्यात एकूण ३२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. तरी यावर्षी मुर्त्यांच्या उंच्या कमी ठेवाव्या तसेच गणेश पूजन व मिरवणूकी बाबत आव्हान करण्यात आले.
●गृह विलगीकरणाचे नियम मोडणे, ई-पासशिवाय जिल्ह्यात प्रवेश करणे इत्यादी कारणांसाठी ५००० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
●गणेशोत्सवादरम्यान एकमेकांच्या घरी गणपती दर्शनासाठी जाऊ नये. स्वतःच्या घरीच पूजन करावे.
●गणपती विर्सजनाच्या दिवशी दुपारी जेवण (म्हामंद) असतं ते सुद्धा स्वतःच आपापल्या घरीच करावे.
●विर्सजनाच्या दिवशी एका मूर्तीसोबत कुटूंबातील फक्त २ व्यक्तींना जाण्यास परवानगी. विर्सजनाच्या दिवशी सोशल डीस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करावे.
● आरती, भजनांसाठी एकत्र न येता आपापल्या घरीच भजन, आरत्या कराव्यात तसेच सत्यनारायणाची पूजा, डबलबारी भजनांच्या कार्यक्रमांचा आयोजन न करण्या आव्हाहन करण्यात आले.
●बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची नोंद ग्रामस्तरीय समितीकडे असणे आवश्यक राहील. तसेच त्याची वैद्यकीय चाचणी करणे आवश्यक राहील.
●गणेशोत्सव कालावधीत फोंडा, करूळ, आंबोली व खारेपाटण चेकपोस्ट येथे २४ तास पथक नेमण्याची असल्याने ज्यादा कर्मचारी वर्गाची आवश्यक्यता आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील शासकीय कर्मचार्यांनी गणेशोत्सवाच्या काळात सुट्टीची मागणी करू नये. तसेच आरोग्य विभागाने चेक पोस्ट येथे आवश्यक असलेले थर्मल गन इ. पुरेशा प्रमाणात उपलब्ध कराव्यात.