मनसैनिकांनी ‘तो’ स्टुडिओ फोडला; छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या कॉमेडियनने दिला माफीनामा

मनसैनिकांनी ‘तो’ स्टुडिओ फोडला; छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या कॉमेडियनने दिला माफीनामा

मुबंई: स्टँड अप काॅमेडीयन अग्रिमा जोशुआ हीने केलेल्या एका स्टँड अप काॅमेडीची व्हिडीयो सोशल मिडीयावर वायरल होत आहे. त्यात तिने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विनोद केल्यामुळे कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
अग्रिमा जोशुआने अरबी समुद्रात बांधण्यात येणार्या छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यावर काॅमेडी मधून टीका केली. शिवाय महाराजांचा उल्लेखही एकेरी शब्दात केला आहे असे म्हटले जात आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ताबडतोब अग्रिमा जोशुआ ने ज्या स्टुडीओ मार्फत काॅमेडी केली होती त्या तोडफोड करून माफीनामा मागितला. शिवाय तिने लेखी माफिनामा दिल्याचेही सांगण्यात आले आहे.

अग्रिमा आपल्या व्हिडीओत म्हणते कि, “शिवाजी या पुतळ्याबाबत अधिक माहिती जाणण्यासाठी मी गुगलवर Quora इंटरनेट सोर्सवर गेली तर कोणीतरी निबंध लिहिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते शिवाजी पुतळ्याचा मास्टरस्ट्रोक आहे जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात सत्ता येईल, दुसऱ्या एकाला वाटलं काहीतरी क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट आहे, तो म्हणाला, या जीपीएस ट्रेकरसुद्धा असणार आहे शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून डोळ्यात निघेल व अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर नजर ठेवेल. त्यातच अजून एक व्यक्ती येऊन सांगतो, शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, मग मी त्यालाच फॉलो केलं” अशा शब्दात अग्रिमाने विनोद केल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत असून त्यांच्यावर विनोद अजिबाद सहन केली जाणार नाही. महाराष्ट्र सरकार आणि पोलीसांनी स्टँड अप काॅमेडीयांवर कारवाई करावी असे नेटकरी म्हणत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत