अमिताभ बच्चन बरोबर अभिषेकही कोरोना पाॅझिटीव्ह…

अमिताभ बच्चन बरोबर अभिषेकही कोरोना पाॅझिटीव्ह…

बाॅलीवूड इंडस्ट्रीतील मेगास्टार अमिताभ बच्चन यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. अमिताभ बच्चन यांचा कोरोना रीपोर्ट पाॅझिटीव्ह आल्याने त्याना शनिवारी संध्याकाळी नानावटी हाॅस्पिटल मधे अॅडमिट केले.अमिताभ बच्चन यांनी स्वतःच आपला रीपोर्ट पाॅझिटीव्ह आल्याची माहीती ट्विटर द्वारे दिली. शिवाय त्यांच्या घरातील व्यक्तींचेही स्वॅब रीपोर्ट करण्यात आले होते. परंतु त्याचा रीपोर्ट अद्याप आले नव्हते. पण आताच अभिषेक बच्चन चा ही कोरोना रीपोर्ट पाॅझिटीव्ह आल्याची माहीती मिळालेली आहे.

अभिषेक बच्चन यांनी लिहिले की, ” आज माझे वडील अमिताभ बच्चन व मी दोघेही कोविड १९ च्या चाचणीत पाॅझिटीव्ह आलो. हळू हळू लक्षणे जाणवल्याने दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्ही सर्व आवश्यक अधिकार्‍यांना कळविले आहे आणि आमचे कुटुंब आणि कर्मचारी सर्व चाचणी घेत आहोत. मी सर्वांना शांत राहण्याची विनंती करतो आणि घाबरू नका. धन्यवाद. ” असे ट्विट केले आहे.

अभिषेक बच्चन आणि त्याचे वडील यांच्या संपर्कातील सगळ्या लोकांना क्वाॅरंटाईन देखील करण्यात आले आहे. शिवाय त्यांनी ट्विट द्वारे आपल्या संपर्कात मागील १० दिवसात आलेल्या व्यक्तींनीही आपली कोरोना चाचणी करावी असे बच्चन कुटुंबानी यांनी सांगितले आहे.

मार्चमधे लॉकडाउन सुरू झाल्यापासून ते सर्व घरीच थांबले होते, त्यांनी अलीकडेच कौन बनेगा करोडपती शो आणि त्याच्या इतर प्रकल्पांसाठी प्रमोशनल सामग्री घरातच शूट केली होती आणि म्हणूनच त्याच्या घरी आलेल्या प्रॉडक्शन क्रू शी संपर्क साधला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत