अंकिता ने सुशांत च्या आत्महत्ये प्रकरणी केला मोठा खुलासा! वाचा..

अंकिता ने सुशांत च्या आत्महत्ये प्रकरणी केला मोठा खुलासा! वाचा..

सुशांत सिंग राजपूत च्या आत्महत्या प्रकरणाने आतापर्यंत खूप वळणे घेतली. परंतु आत्ताच समोर आलेल्या माहीतीनुसार या प्रकरणाला महत्वपूर्ण वळण लागले आहे. सुशांत सिंग राजपूत ची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे ची चौकशी करण्यात आली. त्यात तिने काही धक्कादायक गोष्टी शेअर केल्या आहेत.
सुशांत सिंग राजपूत च्या वडीलांनी बिहार पोलीस ठाण्यात एफ.आय.आर दाखल केल्यानंतर बिहार पोलीस चे काही कर्मचारी मुबंईत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आले. त्याच्यांशी बोलताना अंकिता ने सांगितले कि, रीया चक्रबोर्टी ने सुशांत ला खुप त्रास दिला.
सुशांत ने त्याची पूर्व गर्लफ्रेंड अकिंता लोखंडे ला तिच्या ‘मनिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या रीलीज दरम्यान अभिनंदन करण्यासाठी मेसेज केला होता. अंकिताचा हा चित्रपट बाॅलीवूड मधील पहीलाच डेबट चित्रपट होता.
सूत्रांनुसार कळाले कि, अभिनंदन करताना सुशांत ने आपल्या लव लाईफ बद्दल काही गोष्टी अकिंता बरोबर शेअर केल्या तो रीया चक्रबोर्टी बरोबरच्या रीलेशन मधे खुष नव्हता. अंकिताने सुशांत बरोबरचे चाट्स बिहार पोलीसांबरोबर शेअर केले आहेत. ज्या मधे तो रीया चक्रबोर्टी बरोबर बोलत आहे. शिवाय हे चाट्स तिने सुशांत ची बहीण श्वेता सिंग किर्ती बरोबर देखील शेअर केले आहेत.
सुशांत च्या आत्महत्येनंतर अकिंता ने दोनदा सुशांत च्या पटना येथील घरी त्याच्या कुटूंबाला भेट दिली. अकिंता आणि सुशांत सहा वर्षाच्या रीलेशनशीप नंतर वेगळे झाले. बिहार मधे सुशांतचा वडीलांनी एफ.आय.आर दाखल केल्यानंतर अकिंताने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वर एक पोस्ट केली त्यात लिहले आहे ‘सत्य जिंकते’.

https://www.instagram.com/p/CDN3Vfrh78X/?igshid=1vsbdf4pbl9kx

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत