बाॅलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत सुसाईड मिस्टरी मधील गुंता दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सीबीआय या प्रकरणावर कसून चौकशी करत आहेत. दरम्यान या प्रकरणात धारेवर असणारी व्यक्ती म्हणजेच रीया चक्रवर्ती ची चौकशी सीबीआय चार दिवस करत आहे.या चौकशी दरम्यान रीया ने अनेक खुलासे केले आहे.
काही दिवसांपूर्वीच रीया आणि दिग्दर्शक-निर्माता महेश भट्ट यांच्यातील व्हाट्सअप चाट्स चे स्क्रिनशाॅट सोशल मिडीयावर वायरल झाले होते. तेव्हापासूनच सर्वांच्या मनात महेश भट्ट आणि रीया चक्रवर्ती यांच्यातील नात्यावर प्रश्न निर्माण झाले होते.
सीबीआय च्या चौकशी दरम्यान रीयाने याबाबत खुलासा केला आहे. महेश भट्ट यांच्याबरोबर काम करत असल्यापासून महेश भट्ट आणि माझे संबंध खूप चांगले आहेत. ते माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत. मी सुशांतचे घर सोडलं तेव्हा माझ त्यांच्याबरोबर व्हाट्सअॅप वर बोलणं झाल हे खरं आहे, असं रियानं चौकशी दरम्यान म्हटलं आहे.
महेश भट्ट हे मला मुलगी मानतात आणि मी त्यांना सर बोलते. ८ जून रोजी मी त्यांना म्हटलं की मला घराबाहेर काढण्यात आलं आहे आणि मी आतमधून खूप कोलमडली आहे. सर त्याला कळत नाही का मी एवढे दिवस त्याचा सांभाळ केला आहे. त्याची देखरेख करता करता माझी अवस्था खूप बिकट झाली आहे, असं रिया त्या दिवशी महेश भट्ट यांना व्हाट्सअॅपवरून बोलली असल्याचं रियानं सीबीआयला सांगितलं आहे