भारताने ११८ अॅप्सवर  बंदी घालण्यामागचं काय आहे कारण ? सविस्तर वाचा…

भारताने ११८ अॅप्सवर बंदी घालण्यामागचं काय आहे कारण ? सविस्तर वाचा…

२ महिन्यांपूर्वीच माहीती आणि तंत्रज्ञान विभागाने चायना शी लिंक अहलेल्या ५९ अॅप्सवर बंदी आणली. आणि २ महिन्यानंतर आत्ता तब्बल ११८ अॅप्सवर बंदी घालण्यात आलेली आहे. या मधे सर्वाधिक लोकप्रिय गेमिंग अॅप PUBG चा देखील समावेश आहे.
मंत्रालयाने म्हटले आहे कि अॅप्स बॅन करण्यात आले कारण ते भारतीय सार्वभौमत्व आणि अखंडतेचे पूर्वग्रहवादी आहेत, भारताचे संरक्षण, राज्य आणि सार्वजनिक क्षेत्राची सुरक्षा यांच्या दृष्टीने हानिकारक आहेत.
या अॅप्स बंदीमधे PUBG मोबाईल नाॅरडीक मॅप, PUBG मोबाईल लाईट, लिविक, वी-चाट वर्क, बायडू, टेनसेन्ट वेयून पण त्यापैंकी एक आहे. हिमालयीन बाॅर्डर वरील विवादा नंतर परराष्ट्र मंत्रालयाने चिनी सैन्यांवर सक्रिय कारवाईचा आरोप केल्याच्या एक दिवसानंतर हा निर्णय आला आहे.

मिनिस्ट्री कडे मोबाईल अॅप्स बद्दल गैरवापर करण्याच्या अनेक कम्प्लेंन्टस वेगवेगळ्या ठिकाणाहून आल्या आहेत. अॅन्ड्राईंड आणि आयओएस वर उपलब्ध असलेले अॅप्स हे चोरून आणि गुप्तपणे अनधिकृत पद्धतीने वापरकर्त्यांचा डेटा सर्व्हरकडे हस्तांतरित करत आहेत ज्याचे भारताबाहेर स्थाने आहेत.
या माहीतीचे संकलन , खाणकाम आणि राष्ट्रीय सुरक्षा आणि भारताच्या संरक्षणास प्रतिकूल घटकांद्वारे प्रोफाइलिंग ही त्वरित उपाययोजनांची आवश्यकता असलेल्या गहन आणि त्वरित चिंतेचा विषय आहे.

इंडीयन सायबर क्राईम को-ऑर्डीनेशन सेंटर आॅफ हो मिनिस्ट्री ने हे असुरक्षित अॅप्स् बॅन करण्यासाठी अत्यंत विस्तृत असा प्रस्ताव मांडला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत