दोन दिवसांत अंतिम वर्षांच्या परीक्षेची लिंक देण्यात येईल – मुबंई विद्यापीठ..

दोन दिवसांत अंतिम वर्षांच्या परीक्षेची लिंक देण्यात येईल – मुबंई विद्यापीठ..

मुंबई : अखेर कोर्टाच्या निर्णयानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची परवानगी विद्यापीठांना देण्यात आली. मुबंई विद्यापीठातील बॅकलाॅगच्या अंतिम वर्षातील परीक्षा सुरू झालेल्या आहेत. नियमित (रेग्युलर विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील १ आॅक्टोबर पासून सुरू होणार आहेत.
१ आॅक्टोबरपासून सुरू होणार्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून त्यांना परीक्षेसंबंधी लिंक ही परीक्षेच्या २ दिवस आधी, ३० सप्टेंबरपूर्वी पाठविण्यात येईल, असे मुंबई विद्यापीठाने सांगितले आहे. अंतिम वर्षाच्या आॅनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन परीक्षेसाठी स्मार्टफोन, लॅपटॉप, संगणक यापैकी कोणती साधने उपलब्ध आहेत? विद्यार्थी सध्या वास्तव्यास कुठे आहेत? इंटरनेट कनेक्शनची उपलब्ध आहे की नाही त्याची काय परिस्थिती आहे? या संदर्भात माहिती विद्यापीठाने प्रत्येक विद्यार्थ्यांकडून गोळा केली.

हेदेखील वाचा : रोज सकाळी वाफ घेणे आहे, आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर…!!

ऑनलाईन परीक्षांसाठी विद्यापीठ विभागाने अ‍ॅप विकसित केले आहे. यावरून विद्यार्थ्यांना आॅनलाइन परीक्षा देणे शक्य होईल. त्या संदर्भातील लिंक त्यांना येत्या २ दिवसांत मिळणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.

शिवाय कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. अनेकांच्या नोकर्या गेलेल्या आहेत. सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, विविध विभाग त्यांचे प्राचार्य यांना विद्यार्थ्यांना शुल्कात दिलासा देण्याचे निर्देश एआयसीटीई आणि यूजीसी यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विद्यापीठाने दिले आहेत. महाविद्यालयांनी शुल्क वाढ करू नये, तसेच त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून शुल्काचे विभाजन ४ हप्त्यांत भरण्त्यांयाची सुविधा त्यांना उपलब्ध करून दिलासा द्यावा, असे निर्देश प्रभारी कुलसचिव विनोद पाटील यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत