थॉमस अल्वा एडिसन असे हे संशोधक बुद्धिचे महान उद्योगी यांचा आज स्मुतीदिन. १० फेब्रुवारी १८४७ रोजी अमेरिकेच्या ओहियो संस्थानातील मिलन या शहरात जन्म झाला. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पुर्ण केलेल्या एडिसनला रसायन शास्त्रात रुची होती,डेट्रॉइट येथे एक हँड प्रिंटिंग प्रेस खरेदी करुन त्याने स्वतःचे ग्रँड ट्रंक हेरल्ड नावाचे वुत्तपत्र चालवले.
पुढे क्लेमेन्स या ठिकाणी तार मास्तरची नोकरी करत असाताना तारायंत्रातून एकाच वेली अनेक ठिकाणी संदेश देण्याची युक्ति शोधली तारायंत्र, फोनोग्राम, टेलिफोन,विजेचा दिवा असे अनेक शोध लावून दूरसंचार सेवेत क्रांती घडवुन आणणारा हा शास्त्रज्ञ,विजेच्या दिव्याचा शोध लावल्यावर एडिसनने विज तयार करण्याची ठीकाणे, विज प्रशेपक्ष करण्याची योजना तयार केली. विद्युत अग्र व विजेची तार यातून विजेचा प्रवाह एकाच दिशेने वाहतो, हा शोध त्यांनी १८८३ मध्ये लावला.या महान उद्योगी संशोधकाकडे जवळ-जवळ बाराशे पेटंट्स होती.
असा बहुधा जगातील एकमेव संशोधक, तो नेहमी म्हेणे,’ बुद्धिमत्ता, प्रतिभा, अथवा स्फूर्ति ही फक्त दोन टक्के,पण कष्ट करुन घाम काढीत राहाणे हे अठ्ठयन्णव टक्के,’ माणसाच्या जीवनात विजेचा देणारा हा प्रकाशयात्री दि. १८ ऑक्टोबर १९३१ रोजी स्वर्गवासी झाला.