माय रेशन मोबाईल अॅप लाॅन्च आता मिळवा कोणत्याही भागात आपल्या हक्काचे रेशन- सविस्तर वाचा

माय रेशन मोबाईल अॅप लाॅन्च आता मिळवा कोणत्याही भागात आपल्या हक्काचे रेशन- सविस्तर वाचा

सार्वजनिक वितरण मंत्रालयाद्वारे माय रेशन मोबाईल अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेला चालना मिळावी या हेतूने हे अॅप लाॅन्च करण्यात आले. स्थानिक मजुरी, नोकरी किंवा कामासाठी आपले गाव सोडून शहरात राहतात, त्यांच्यासाठी हे अ‍ॅप खूप फायदेशीर आहे. या अॅपद्वारे ते जिथे राहत आहेत, तेथे त्यांना रेशन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
माझे रेशन हे अ‍ॅप शुक्रवारी लाँच केले गेले.

हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड केले जाऊ शकते. अन्न आणि सार्वजनिक वितरण सचिव म्हणाले की, वन नेशन वन रेशन कार्ड योजनेची सुरुवात केवळ ४ राज्यांमधून ऑगस्ट २०१९ मध्ये झाली होती. अगदी अल्प कालावधीत याची अंमलबजावणी देशातील ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये झालीय, तर उर्वरित दिल्ली आणि आसाम, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील अन्य तीन राज्यांमध्येही अंमलबजावणी पुढील काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे. दरमहा १.५ कोटी लोक या योजनेत सामील होत आहेत.

हेदेखील वाचा- महाराष्ट्रातील काही भागात लाॅकडाऊन ची घोषणा


या योजनेंतर्गत सुमारे 69 कोटी एनएफएसए लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे, जे एकूण एनएफएसए लोकसंख्येच्या सुमारे ८६ टक्के आहेत. देशात दरमहा सरासरी १.५ ते १.६ कोटी लोक या योजनेशी जोडले जात आहेत. पांडे म्हणाले की, या योजनेंतर्गत कोरोना साथीच्यादरम्यान कोविड -१९ चा विशेषत: प्रवासी कामगारांना फायदा झाला आणि त्यांना अनुदानावर धान्य मिळाले. टाळेबंदीच्या वेळी जिथे लाभार्थी होते, तेथे या सुविधेचा लाभ घेऊन त्यांना धान्य मिळू शकते. लाभार्थी कोणत्याही भागातून रेशन मिळवू शकतात
रेशनकार्ड पोर्टेबिलिटीसाठी देशव्यापी मोहीमदेखील या योजनेंतर्गत अन्न आणि पुरवठा विभाग राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत राबवित आहे. या व्यवस्थेमुळे सर्व एनएफएसए लाभार्थी, विशेषत: स्थलांतरित लाभार्थ्यांना सुविधा उपलब्ध आहे. बायोमेट्रिक किंवा आधारद्वारे लाभार्थी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात आणि रेशन घेऊ शकतात. याअंतर्गत लाभार्थ्यांना संपूर्ण रेशन किंवा त्यातील काही भाग देशातील कोणत्याही स्वस्त दर दुकानातून घेण्याचा अधिकार आहे. या प्रणालीच्या मदतीने अशा प्रकारच्या प्रवासी कामगारांच्या कुटुंबीयांना त्याच रेशनकार्डमधून दुसर्‍या ठिकाणी परत आल्यास उर्वरित रेशन मिळण्याची सोयदेखील आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत