दहावी- बारावींच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने- प्रश्नसंच आॅनलाईन उपलब्ध

दहावी- बारावींच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने- प्रश्नसंच आॅनलाईन उपलब्ध

मुंबई : कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे देशभरात मोठे संकट निर्माण झाले होते. सर्वच क्षेत्रावर याचा परीणाम पाहायला मिळाला होता. कोरोनामुळे शाळा बंद होत्या. शिवाय विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्नदेखील निर्माण झाला. कोरोनामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमदेखील पूर्ण झालेले नाहीत. पण या विद्यार्थ्यांना आता चिंता करण्याची गरज नाही. कारण दहावी बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन प्रश्नसंच उपलब्ध केले जाणार आहेत.
कोरोना चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार, राज्यातील सर्वच शाळा ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
परंतू, यामध्ये दहावी-बारावीच्या वर्गाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

दहावी-बारावी च्या परीक्षा येत्या काही दिवसांत सुरू होत आहे. त्यावरून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले, की कोरोनाची स्थिती पाहून शाळा सुरू करण्याचे अधिकार त्या-त्या स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइनच घेतली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी सरावाकरीता एससीईआरटीकडून प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत