सध्या झोमॅटोचा एक डिलिव्हरी बॉय आणि बेंगळुरूतील एका महिलेने केलेले त्याच्यावरचे आरोप चर्चेत आहेत. झोमॅटो डिलीवरी बाॅयने ऑर्डर रद्द केल्यामुळे आपल्या नाकावर बुक्का मारल्याचा आरोप संबंधित महिलेने केला होता. मात्र यानंतर आरोप करण्यात आलेल्या झोमॅटोच्या त्या डिलिव्हरी बॉयने वेगळीच कथा सांगितली होती. त्या महिलेनेच मला मारहाण केली होती, असा उलट आरोप त्याने केला होता. तसेच नुकतेच या प्रकरणात आता बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने देखील उडी घेतली आहे. परीणीतीने आपल्या ट्वीटर अकांऊट वरून एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की तुमचा हा डिलिव्हरी बॉय निर्दोष आहे, याची मला खात्री आहे. झोमॅटो इंडिया, मी त्याची कशी मदत करू शकते, ते कृपया सांगा, असे परिणीतीने म्हटले आहे.
हेदेखील वाचा-दहावी-दहावी- बारावींच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने- प्रश्नसंच आॅनलाईन उपलब्ध
कामराजने स्पष्ट केले ?
जेव्हा मी पार्सल घेऊन या महिलेच्या घरी पोहोचलो तेव्हा थोडा उशिर झाला होता. मी त्यांची त्यासाठी माफी मागितली. ट्रॅफिक आणि रस्ता खराब असल्यामुळे येथे पोहोचण्यास उशिर झाला, असे सांगितले. मी दोन वर्षांपासून काम करत आहे, अशा प्रकरच्या घटनेला पहिल्यांदाच तोंड देत आहे, असे कामराज म्हणाला. शिवाय हितेशाने जेवण ताब्यात घेऊन पैसे देण्यास नकार दिला. ती म्हणाली की ती झोमॅटो कस्टमर सपोर्टशी बोलत आहे. हितेशाने यानंतर त्याला अश्लिल शिव्या दिल्या व जोरजोरात ओरडायला लागली. तर झॉमॅटो सपोर्टने कामराजला आॅर्डर कॅन्सल केल्याचे सांगितले. यामुळे कामराजने तिला जेवण परत करण्यास सांगितले. परंतु तिने आॅर्नंडर रीटर्न देण्यासही नकार दीला व ती त्याला शिव्या देत होती. अचानक तिने चप्पल उगारली आणि मारायला सुरुवात केली. मी तिला रोखण्यासाठी हात पुढे केला. यावेळी तिने चुकून तिचाच हात नाकावर मारला. मी फक्त तिचा वार रोखण्यासाठी हात पुढे केला होता. तिच्या बोटातील अंगठी तिच्या नाकावर लागली. तिचा व्हिडीओ पाहिल्यास त्यामध्ये स्पष्ट दिसेल असेही त्याने पोलिसांना सांगितले. तिच्या नाकावर जखम झाली ती अंगठीमुळे झालीय, बुक्का लगावल्यामुळे नाही, असे तो म्हणाला.