अहमदाबाद- भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर PAYTM T20 SERIES चालू आहे. रविवारी १४ मार्च रोजी दुसरा टी२० सामना आज झाला. पहील्या सामन्यात भारताला हार पत्कारावी लागली होती मात्र दुसर्या मॅचमधे ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या टी २० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
या सामन्यात इंग्लंडने भारताला १६५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करत भारताने १७.५ षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केला. भारताकडून इशान किशनने ५६ आणि विराट कोहलीने नाबाद ७३ धावांची अर्धशतकी खेळी केली.
पहिल्या १० षटकातच ९० धावांचा टप्पा पार केल्यानंतर विराट आणि रिषभ पंतने इशान कीशन च्या विकेटनंतर पुढेही आक्रमक खेळ सुरु ठेवत पारी सांभाळली. मात्र पंत १४ व्या षटकात ख्रिस जॉर्डनच्या गोंलंदाजीवर १३ चेंडूच २६ धावा करुन बाद झाला.
मात्र विराटने नंतर श्रेयस अय्यरला साथीला घेत भारताला विजयापर्यंत पोहचवले. विराटने ४९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारासह नाबाद ७३ धावा केल्या. तर अय्यर ८ धावांवर नाबाद राहिला.