३१ मार्च पर्यंत वाहनांची कागदपत्रे रीन्यू करावी अन्यथा दंड भरावा लागणार

३१ मार्च पर्यंत वाहनांची कागदपत्रे रीन्यू करावी अन्यथा दंड भरावा लागणार

कोरोना साथीच्या कारणास्तव गेल्या वर्षी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १ फेब्रुवारीनंतर एक्सपायर्ड झालेले ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, फिटनेस सर्टिफिकेट आणि पीयूसी यांची वैधता ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आली होती. परंतू आता सर्व कागदपत्र ३१ मार्चपर्यंत रिन्यू करणं गरजेचं आहे. अन्यथा दंड भरावा लागू शकतो.
मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कागदपत्रांसाठीची वैधता वाढवण्यात आली होती. त्यावेळी देशातील सर्व शहरातील आरटीओ ऑफिसमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी आणि फिटनेस सर्टिफिकेटबाबत अनेक प्रकरणं प्रलंबित होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या समस्या पाहता वाहनांच्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांची वैधता ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आली होती.

मोटर वाहन अधिनियम १९८८ आणि केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ अंतर्गत वाहनांचं फिटनेस सर्टिफिकेट, लायसन्स, परमिट, नोंदणी आणि इतर कागदपत्रांची वैधता ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्याचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निवेदनात घेण्यात आला होता.
देशभर कोरोनाने थैमान घातलेले असता सर्वत्र लाॅकडाउन करण्यात आले होते. त्या काळात ज्या वाहनांच्या कागदपत्रांची वैधता २०२० मध्ये संपली आहे, ती कागदपत्र ३१ मार्च २०२१ पर्यंत वैध मानली जातील असा निर्णय घेण्यात आला होता.

परंतु यावेळी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ३१ मार्चनंतर वाहनासंबंधी कोणत्याही कागदपत्रांची वैधता मान्य करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नसल्यामुळे आता कागदपत्र ३१ मार्चपूर्वी रिन्यू करणं आवश्यक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत