लाॅकडाऊन मधे मुबंईचा मसीहा बनलेला अभिनेता सोनू सुदने आयकर बुडवल्याचा आरोप आयकर विभागाने केला आहे.
मुंबई : कोरोना काळात सोनू सुद गरीबांचा प्रिय झाला होता. कारण त्याने अनेक लोकांना लाॅकडाऊन काळात आपआपल्या घरी सुखरूप पोचवले होते. अभिनेता सोनू सुदने २० कोंटीहून अधिक रक्कमेचा आयकर न भरल्याचा आरोप केला आहे. परंतु आता सोनूने २० कोटी रुपयांचा कर चुकवला असल्याची बातमी समोर आल्याने सोनू सुद संकटामधे आला आहे .
मागच्या तीन दिवसांपासून अभिनेत्याच्या घरावर तसेच कार्यालयावर आयकर विभागाची रेड पडली आहे. सोनूसह त्याच्या काही सहकाऱ्यांच्याही घराची तपासणी केली. त्यातून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर चोरी केल्याबद्दल पुरावे हाती लागले आहेत.
आयकर विभागाने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकामध्ये नमूद केले की, सोनू सुद आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी २० कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचा कर चुकवला आहे. तसेच सोनूच्या चॅरीट संस्थेला २.१ कोटी रुपयांची आर्थिक मदत परदेशातून झाली होती. परंतु ही मदत गैरमार्गाने करण्यात आली होती. या व्यवहारामुळे परदेशी देणगी नियमन कायद्याचे (FCRA) उल्लंघन झाले आहे. तसेच जमा झालेला पैसा हा एका क्लाऊड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवरून जमा करण्यात आला होता.
आयकर विभागाने पुढे सांगितले आहे की,
इतकेच नाही तर सोनूने २०२० मध्ये त्याची स्वतःची सामाजिक संस्था सुरू केली. त्याच्या या संस्थेला १ एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत १८.९४ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. या देणग्यांच्या रक्कमेतील १.९ कोटी रुपये वेगवेगळ्या कामासाठी खर्च झाले आहेत. तर शिल्लक राहिलेले १७ कोटी रुपये अद्याप खात्यामध्ये आहेत.
सोनूने कर्जाच्या रुपात बेहिशोबी पैसा जमा केला आहे.
आयकर विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये असेही नमूद केले की, सोनूशी संबंधित असलेल्या ज्या ज्या ठिकाणी विभागाने तपासणी केली त्या ठिकाणांमध्ये मुंबई, लखनऊ, जयपूर, कानपूर, दिल्ली आणि गुरूग्रामसह २८ ठिकाणांचा समावेश आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोनूला त्यांच्या मेंन्रटोंर प्रोग्रॅमचा ब्रँड अँबेसिडर बनवण्यात येत असल्याचे जाहीर केले होते.