२०२१ अखेरपर्यंत झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनाबाबत आदेश जाहीर करण्यात यावे – गोपाळ शेट्टी.

२०२१ अखेरपर्यंत झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनाबाबत आदेश जाहीर करण्यात यावे – गोपाळ शेट्टी.

मुंबई – उत्तर मुंबईचे भाजपा गोपाळ शेट्टी (BJP Gopal Shetty) यांनी मुंबईतील सर्व नागरिकांना हक्काचे घर मिळावे आणि मुंबई झोपडपट्टीमुक्त व्हावी यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करून डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत नागरिकांच्या हितासाठी आदेश जारी करावेत अशी मागणी आज लोकसभेत केली आहे. 
आत्तापर्यंत २ लाख ३९ हजार झोपडीधारकांना घरे मिळाली असून सध्या मुंबईत १५ लाख झोपडपट्टीवासीय चांगल्या घरांच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबईच्या झोपडपट्ट्यांचा मुद्दा लोकसभेत मांडण्यात आला आहे.
आज दिनांक १ डिसेंबर २०२१ रोजी लोकसभेचे हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी २०११ पर्यंतचा झोपडप्टीवासीयांना पक्की घरे देण्याचा जीआर काढला होता.

गृहनिर्माण मंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल  भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री यांच्यासह आजपर्यंत अमलबजावणीसाठी अनेक बैठका, चर्चा करण्यात आल्या. विकासक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे आवाज उठवण्यात आला. शिवाय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे देखील याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना झोपडपट्टी पुनर्वसन, मुलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात व सद्यस्थितीबाबत उत्तर देण्यासाठी आयोगासमोर हजर राहण्याचे समन्स देखील पाठविण्यात आले आहे. हे सर्व मुद्दे आज लोकसभेच्या शून्य प्रहरात त्यांनी आपल्या भाषणात मांडले आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत