आजकालच्या तरूण पिढीत पिंपल्स ही समस्या सगळीकडे आढळते. पिंपल्स ही समस्या मुले आणि मुली दोघांमधे आढळतात. वाढते प्रदूषण चेहरा खराब करत असतात. वाढत्या वयाबरोबर आपल्या शरीरात होणार्या हार्मोनल बदलांमुळे सुद्धा चेहर्यावर पिंपल्स येतात.
पिंपल्स कमी करण्याचे घरगुती उपाय जाणून घेऊया.
दिवसातून ३-४ वेळा आपला चेहरा धुवा. त्यामुळे आपल्या चेहर्यावर जमा होणारी घाण कमी होईल. शिवाय पिंपल्सना सारखा सारखा हात लावू नका. असे केल्यास बॅक्टेरीया तुमच्या चेहर्यावर जातात व त्यामुळे पिंपल्स वाढतात.
ग्रीन टी चा उपयोग करून सुद्धा चेहर्यावरील पिंपल्स घालवता येतात. ग्रीन टी गरम पाण्यामधे २-३ मिनीट बुडवा. नंतर ग्रीन टी ला थंड होऊद्या. नंतर कापसाने ते तोंडावर लावा. १० मिनीट त्याला तसेच सोडा त्यानंतर तोंड धुवून घ्या. दिवसातून २-३ वेळा असे केल्यास काही आठवड्यांत तुम्हाला फरक जाणवेल.
हेदेखील वाचा : डोकेदुखी पळवण्यासाठी हे करुन पाहा.
जास्तीत जास्त पाणी प्या. असे केल्यास शरीरातील घाण बाहेर येतील आणि चेहर्यावरील पिंपल्स कमी होण्यास मदत मिळेल.
तेलकट पदार्थाचे प्रमाण कमी करा. तेलाचे पदार्थ सेवन केल्याने त्वचेच्या तेलाची पातळी वाढते आणि पिंपल्सची समस्या देखील वाढते.