हिंगाचे औषधोपयोगी फायदे जाणून घ्या.

हिंगाचे औषधोपयोगी फायदे जाणून घ्या.

हिंगाचे औषधोपयोगी फायदे;

हिंग औषधी गुणांमुळे आरोग्यासाठी ही अतिशय उपयुक्त आहे.
कोणताही पदार्थ बनवताना त्याला फोडणी देताना चिमूटभर हिंग घातलं की, पदार्थाची लज्जत वाढते. पदार्थाला छान स्वाद आणि सुगंध प्राप्त होतो.

पोटदुखी, किंवा पोट फुगणं यापैकी कोणताही त्रास झाल्यास चिमूटभर हिंग खा. पोटावर बेंबीच्या भोवताली हिंगाचा पाण्यासोबत तयार केलेला लेप लावल्यास, त्वरित आराम मिळतो.

कान दुखत असल्यास २ चमचे तिळाच्या तेलामध्ये अर्धा लहान चमचा हिंग, २ लसणाच्या पाकळ्या आणि थोडं सैंधव घालून एकत्र गरम करा. हिंग जळल्यावर तेल थंड करून, गाळून बाटलीमध्ये भरून ठेवा. कान दुखत असल्यास किंवा कानात आवाज येत असल्यास, रात्री झोपताना या तेलाचे २ थेंब कानात टाका. असं सलग आठवडाभर केल्यास कानासंबंधीच्या सर्व त्रास दूर होतील.

काटा रुतल्यास चिमूटभर हिंग पाण्यात भिजवून त्या जागी लावा. वेदना कमी होतीलच त्याचबरोबर, काटाही आपोआप बाहेर पडतो.

दात दुखत असल्यास हिंग पाण्यात उकळवून, त्या पाण्याने गुळण्या कराव्यात दात दुखीत आराम मिळतो. दातांमध्ये खड्डा असेल, तर त्यात हिंग भरून ठेवा. दातांत किडे असल्यास, तेही मरतील.

डोकेदुखी हिंग गरम करून, त्याचा लेप कपाळावर लावल्यास आराम मिळतो.

पायाच्या भेगा भेगांना कडुनिंबाच्या तेलात हिंग मिसळून लावल्यास त्वरित आराम मिळतो.

मासिक पाळी सुरू झालेल्या दिवसापासून तीन दिवस सलग दररोज सकाळी पाण्यामध्ये चिमूटभर हिंग घालून प्या. पोटदुखीमधे आराम जाणवेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत