निलगिरी तेलाचे फायदे
काही इंफेक्शनमुळे किंवा नाक बंदझाल्यामुळे थंडीत कानदुखीची समस्या वाढते. कानात मळ साचून राहतो.त्रास होत असल्यास अनेकजण त्यावर उपाय म्हणून बाहेर फिरताना स्कार्फ किंवा इअर बर्डस वापरतात. पण वेदना खूपच वाढल्यास पेनकिलर घेतात तर तसे न करता ‘निलगिरीचे तेल’ वापरून बघा.
निलगिरी तेल का आहे फायदेशीर ?
निलगिरीच्या तेलामध्ये अॅन्टीसेप्टीक तसेच अॅन्टिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. इंन्फेक्शन वाढवणार्या बॅक्टेरियांचा नाश करण्यासाठी निलगिरीचे तेल खुप उपयुक्त ठरते.तसेच वेदना कमी करण्यासही मदत होते. सोबतच सर्दी-पडशाचा त्रास, श्वसनाच्या विकारांपासून आराम मिळतो. नाक चोंदल्याने होणारी कानदुखी कमी करण्यासही निलगिरीचे तेल फायदेशीर ठरते. दाढ दुखत असल्यास निलगिरी व लवंग तेलात कापसाचा गोळा दुखऱ्या दाढेवर ठेवावा.
वाफ घेणे :
सर्दीमुळे किंवा नाकबंदीने कान दुखत असल्यास वाफ घेणे अधिक फायदेशीर ठरते. यासाठी गरम पाण्यात 4-5 निलगिरीच्या तेलाचे थेंब टाका. डोकं जाड चादरीने किंवा टॉवेलने झाका. हळूहळू श्वास घ्या. श्वास घेताना नाक मोकळे होईल. शिवाय कानदुखीचा त्रासही कमी होतो.
मसाज :
कानाच्या बाहेरील भागावर निलगिरीच्या तेलाने मसाज केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. तसेच वेदना कमी होण्यास मदत होते. तसेच कानात साचलेली मळ मोकळा होण्यासही मदत होते. मात्र त्यासोबत खोबरेल तेल मिसळून मानेकडे खालच्या बाजूला मसाज करावे असे केल्यास जास्त आराम पडतो.
टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Vmarathi.com याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.