वेळेचे महत्व जाणून घ्या.

वेळेचे महत्व जाणून घ्या.

वेळेपेक्षा जास्त मौल्यवान वस्तू या दुनियेत नाही. ज्याला वेळेच महत्व कळलं तोच खरा माणूस या जगात काहीतरी करू शकतो.

पण काहींना ती वेळ निघुन गेल्यावर कळत तर काहींना वेळेबरोबर ध्यान येत व ते वेळेचा पुरेपुर वापर करतात.

वेळ ही खूपच गुंतागुतीची गोष्ट आहे. मोठमोठ्यांचा हातातून ती निसटून गेलेली असते आणि अनेकांच्या हातात ती इतकी असते की, तिचे काय करायचे हेच त्यांना कळत नाही.

आपण जेव्हा सिनेमाचे तिकीट काढतो तेव्हा मनोरंजनासाठी पैसे मोजत असतो. पण सिनेमाशी निगडीत काही कलावंत, तंत्रज्ञ, वगैरे मंडळी त्यांची तासानुसार फी घेतात.

अनेकांसाठी सिनेमाचे तिकीट तमस्वस्त असते पण तीन तास महाग असू शकतात. उदा. काही वकील, शिक्षक, तासानुसार त्यांची फी आकारतात.

यावरून तात्पर्य इतकेच की वेळेला रोकडा किंमत असते, मग आजच्या काळात ‘फायनांन्स मॅनेजमेंट’ ला जे महत्व आहे, तेवढे महत्व ‘टाईम मॅनेजमेंट ला देखील हवे.

याचे कारण म्हणजे ‘डिमांड-सप्लाय’ चा खेळच. वेळेची आणखी गंमत म्हणजे ती विकता येते किंवा भाड्याने देता येते किंवा लाॅग लीजवरसुद्धा देता येते.

आत्ता उदा. नोकरी करणारा रोज आठ-नऊ तास याप्रमाणे आपला वेळ त्याच्या कंपनीला कौशल्य आणि बुद्धिमत्तेसह विकतो असेच म्हणता येईल.

मेहनतीचे माध्यम वेळ आहे. म्हणजे वेळेचे पैशांत किंवा कोणत्याही यशात रूपांतरण करण्यासाठी मेहनत, कौशल्य, बुद्धिमत्ता अशा माध्यमांची गरज असते, जी प्राप्त करण्यासाठी पुन्हा वेळेचीच गरज असते..!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत