तुम्हाला भिमसेन कापूर बद्दल माहीत आहे का ?
कापूर म्हणजे नेमकं काय हेच भरपूर लोकांना माहित नाही. कापूर दोन प्रकारचे आहेत एक म्हणजे केमिकल कापूर आणि दुसरा नैसर्गिक कापूर. या दोघांमधे नेमका काय फरक आहे तो जाणून घेऊया.
पुजेसाठी जो कापूर वापरला जातो तो रासायनिकरित्या बनवलेला असतो. एक प्रकारचा मेणचट, ज्वलनशील आणि पांढरट अशा प्रकारचा हा रासायनिक कापूर असतो. क्यॆम्फ़र म्हणुन ओळखला जाणारा हा प्रकार किटोन कार्बॊन संयुगांच्या वर्गात मोडतो. या कापूरच्या ज्वलनाने हवेत प्रदुषण होते. हा कापूर बाजारात कमी दरात मिळतो.
नैसर्गिक कापूर हा आर्युवेदिक उसतो त्याला भिमसेन कापूर म्हणुनसुद्धा ओळखले जाते.
हे कापूर नेमकं कुठे मिळत ?
जंगलांमध्ये एक सदाहरीत प्रकार झाड असते. शक्यतो आशिया खंडातील पुर्वेकडच्या काही देशांत हे आढळते. सुमात्रा, ईंडोनेशिया आणि बोर्निओया या देशांत आढळणाऱ्या ह्या झाडापासून कापूर निर्मिती होते. नैसर्गिक उत्पादन कापुरचा उपयोग खाण्यात, औषधांमध्ये, पुर्वापार धार्मिक विधींमध्ये केला जातो.
हे देखील वाचा : हिंगाचे औषधोपयोगी फायदे जाणून घ्या.
हा कापूर नैसर्गिकरीत्या उपलब्ध होत असल्याने त्याची किंमत जास्त असते. मात्र हल्ली जो कापूर आपण अगदी स्वस्त भावात विकत घेतो ते टरपेन्टाईन प्रकारातलं ज्वालाग्रही रसायन असतं. आपल्या दैंनदिन जीवनातील विक्स वेपोरब वगैरे सारख्या औषधांमध्ये वापरलेले असते असेच रासायनीक प्रमाण असते. रासायनिक कापूर खाण्यास योग्य नसतो. याचे सेवन झाल्यास अनेक घातक परिणाम होऊ शकतात.
नैसर्गिक कापूरच झाड नेमकं कस दिसतं ?
कापराचे झाड अतिशय उंच वाढतेच तसेच जमिनीत लांबवर मुळं रुजवते. या झाडाचे बहुतेक सर्व भाग वापरले जातात भिमसेनी कापूर कुठल्याही विशिष्ट आकारात येत नाही. स्फटिकासारखा येतो. याचे गोल, चौकोनी वडीत रूपांतर करता येत नाही. कारण नेहमीच्या कापराप्रमाणे यात मेण नसते. सुमात्रा, बोर्निऒ च्या जंगलात साधारण ८० ते १०० फ़ूट वाढणाऱ्या या झाडापासून हा भिमसेनी कापूर मिळतो. ही झाडं जसजशी मोठी होत जातात, तसतसे यांच्या खाचांमध्ये कापराची निर्मिती होते. याची उपत्ती कमी असल्यानेच हा कापूर महाग असतो. अनेक शतकांपासून या देशांमधून अनेक ठिकाणी कापूराचा अर्क पाठवण्याचा व्यवसाय सुरु होता.
आपण कसे वापरतो?
भिमसेनी कापूर हा आयुर्वेदिक उत्पादन असून त्यात कुठल्याही रसायनांचा सहभाग नसतो. मोठ्यामोठ्या बांधकामांसाठी तसेच मजबूत वापरासाठी (जसे की रेल्वेच्या स्लीपर्स फ़ळ्या) या झाडाच्या लाकडाचा वापर होतो कारण कापराचे लाकूड अतिशय मजबूत असते अशे जाते. झाडाच्या पानांपासून पुर्वापार ‘तैलार्क’ बनवला जातो जो आजही अनेक देशांमधे त्वचेवर आधारीत केल्या जाणार्या अनेक उत्पादनांमधे वापरला जातो.
आपले पुर्वजांचे कौतुक करावे तेवढे कमीच ज्यांना या नैसर्गिक घटकांचा उपयोग व वापर चांगल्या प्रकारे माहीती होता.