सुशांत सिंग राजपूत याने केली आत्महत्या.

सुशांत सिंग राजपूत याने केली आत्महत्या.

बाॅलीवूड स्टार सुशांत सिंग राजपूत याने केली आत्महत्या.

जून १४ मुबंई: बॉलिवूडमधून एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ‘एम एस धोनी’ या चित्रपटातील लिड अभिनेता स्टार सुशांत सिंगने आपल्या मुबंईतील बांद्रा येथील राहत्या घरी त्याने फाशी लावून आत्महत्या केली. २१जानेवारी १९८६ रोजी ‘पटना’ येथे त्याचा जन्म झाला होता. वयाच्या ३४ व्या वर्षी त्याने आत्महत्या केली आहे. घरातील नोकराने पोलीसांना फोन करून कळविले. पोलीसांना सकाळी १०.३० च्या सुमारास फोनवर घटनेबद्दल समजले.

बांद्रा येथील लिटल हाईट्स अपार्टमेंट मधील घरी त्याने फॅनला लटकून फाशी लावली. फाशीचे कारण अजून समोर आलेले नाही. पोलीसांनी ताबडतोब घटनेच्या ठीकाणी धाव घेतली व तपासणी चालू आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची पूर्व मॅनेजर दिशा सलियान ने ९ जून रोजी बिल्डींग वरून उडी मारून आत्महत्या होती. त्याने शेवटची इंस्टाग्राम पोस्ट ३ जून रोजी केली होती त्यात त्याने आपल्या आईच्या आठवणीत काही ओळी लिहल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CA-S3cIDWOx/?igshid=1lxc8553csn6p

सुशांत सिंग ने आपल्या करीअर ची सुरूवात टीव्ही अॅक्टर म्हणून केली होती. त्याने सर्वात पहीले  ‘किस देश में है मेरा दिल’ या कार्यक्रमाने केली होती परंतु त्याला ओळख मात्र एकता कपूर च्या ‘पवित्र रीश्ता’ या धारावाहिक ने भेटली होती त्यानंतर त्याने चित्रपट करण्यास सुरूवात केली. ‘काय पो छे’ या चित्रपटात तो मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसला आणि त्याच्या अभिनयाचेही कौतुक केले गेले. शिवाय ‘पी के’ सारख्या सुपरहीट चित्रपटात त्याने काम केले होते. हल्लीच त्याने केलेला ‘चिंचोरे’ चित्रपट पण चांगलाच हिट चालत होता. त्या चित्रपटाची थिमदेखील अशी होती की सुशांत आपल्या मुलाला कितीही प्राॅब्लम्स असले तरी आत्महत्या हे त्यावर सोलूशन नाही आहे. पण रीयल मधे सुशांत सिंगने स्वतः गळफास लावून आत्महत्या केलेली आहे.

त्याचे बाॅलीवूड मधे नुकतेच करीअर सुरू झाले होते. त्याचा शेवटचा चित्रपट चिंचोरे ने पण चांगलेच यश गाठले आहे. त्याला भेटलेला प्रत्येक रोल तो अंत्यत उत्कृष्टरीत्या पार पाडायचा. अशा अनेक शैल्याने तो पूर्ण होता शिवाय तो इंजिनियर देखील होता.

सुशांतच्या आत्महत्येचे कारण अजूनपर्यंत समोर आलेले नाही आहे. पोलीसांची बारकाईने तपासणी चालू आहे. आर्थिक समस्येमुळे तरी त्याने आत्महत्या केलेली नसेल. पण नेमकं कारण समोर आलेले नाही आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत