आरोग्याबद्दल प्रत्येकाने लक्षात ठेवावे काही घरगुती उपाय .
*प्रत्येकाने लक्षात ठेवावी अशी उपयुक्त माहीती*
*कफ झाला असेल तर*
छातीत कफ झाला असल्यास विडयाची पाने ठेचून रस काढून तो मधाबरोबर चाटावा. तसेच छाती, पाठ गरम पाण्याने शेकण्यावर देखील कफ सूटून येतो.
*घसा खवखवत असेल-*
घसा खवखवण्याचा त्रास आपल्याला बर्याच वेळा होतो. घसा खवखवत असल्यास चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो)आणि खडी साखर जिभेवर ठेवून चघळत राहावे. त्याने खूप आरामदायक वाटेल.
*खोकला येत असल्यास-*
खोकल्याची ढास येत असल्यास कात व साखर मिश्रण चघळावे. किंवा आख्खा सालासकट वेलदोडा गालात धरून ठेवावा.
हे देखिल वाचा : धक्कादायक खुलासा ! या कारणांमुळे सुशांत सिंग ने कली असावी आत्महत्या…
*घसा दुखत असेल*
घसा दुखणे – गरम दूधात हळद व साखरचे मिश्रण करून प्या. हे दूध पिल्याने घसादुखी कमी होते तसेच लवंग चघळण्यानेही घसादुखी कमी होते.
*तोंड येण्यासारखे वाटल्यास*
मुख्यता बिघडलेल्या पचनामुळे तोंड येते. तोंड येणे म्हणजे जीभ हुळहुळी होणे. तोंड आलायावर जीभेवर फोड येतात तसेच तिखट खाल्ल्यावर झोंबले जाते व जिभेलात्रास होतो. जीभ लालभडक होते. अशा वेळी दोन-दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस, दूध, ताक,
सरबत यांसारखे पदार्थ घ्या. पोटाला दोन दिवस आराम दिला की आपली पचनक्रिया व्यवस्थात होते आणि जिभेला आलेली लाली व पुरळ कमी होण्यास मदत मिळते.
*घसा बसल्यास* वेलदोडा दाणे व साखर एकत्र चघळणे. घसा बसल्यास कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्या घसा दुखणे असे केल्यास खुप आराम पडतो.
*पाय दुखणे*
पाय दुखण्याचा त्रास हा संगळ्यांनाच कधी ना कधी होत असतो. अशावेळी पाव चमचा कच्चे तीळ चावावे. महिनाभर हा उपाय केल्याने पाय दुखणे थांबते.
*पोटदुखी*
पोट दुखत असल्यास ओवा व साखर गरम पाण्याबरोबर घ्यावा त्याने पोटदुखी कमी होते. लहान बाळांमधील पोटदुखी पोट शेकण्यानेही कमी होते. अगदी तान्हे बाळ असेल तर आईने ओवा चावून बाळाच्या बेंबीवर तोंडानेच वाफारा सोडला तरी पोटदुखी कमी होते. मात्र गॅसमुळे बाळाचे पोट दुखत असेल तर हिंग पाण्यात कालवून त्याचा लेप बेंबीभोवती दिल्याने आराम पडतो.
टीम – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे vmarathi.com याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.