बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून ला आत्महत्या केली. आपल्या राहत्या घरी त्याने पंख्याला लटकून गळफास लावला.त्याचा मृत्यूला एक आठवडा होण्याआधीच त्याच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्यात येणार अशी घोषणा केली आहे. सुशांत सिंग राजपूत ने ‘एम.एस.धोनी या चित्रपटात भारतीय क्रिकेट संघाचा पूर्व कर्णधार महेंद्र सिंह धोनी याची हुबेहूब भूमिका पडद्यावर साकारली होती आता सुशांत ची लाईफ स्टोरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. विजय शेखर गुप्ताने सुशांतवर आधारित एक चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी “सु*सा*ई*ड*कि*म*र्ड*र” असे नाव चित्रपटाचे नाव जाहीर केले आहे.
विजय शेखर गुप्ता एक म्युजिक कंपनी चालक आहेत. न्यूज वेबसाईटशी बोलताना विजयने सांगितले की सुशांतच्या “सु*सा*ई*ड*कि*म*र्ड*र” हा बायोपिक मध्ये त्याने आत्महत्येचं उचललेल्या मोठ्या पावलावर तसेच त्याचाशी निगडीत अनेक समस्यांवर आधारीत असेल. विजयने सांगितले की त्याचा हातून ७ चित्रपट गेल्यामुळे तो तनावामध्ये होता.
हे देखील वाचा : आरोग्याबद्दल उपयुक्त माहीती
तसेच ‘पाणी’ हा चित्रपट गेल्यावर तो खुप रडलादेखील होता. ‘पाणी’ चित्रपटात काम करण्यासाठी तो खूप ‘एक्साईटेड’ देखील होता. फिल्म इडंस्ट्रीमधे काही नेमलेल्या लोकांचे वर्चस्व जास्त असल्यामुळे जे बाहेरून येणारे म्हणजेच ज्यांचा फॅमिली बॅकग्राउंड फिल्मी जगतामधे नाही त्या अभिनेत्यांबरोबर खूप भेदभाव केला जातो.
“सु*सा*ई*ड*कि*म*र्ड*र” या विजय शेखर यांच्या चित्रपटामधे त्यांनी सांगितले की हिरो बनण्याची स्वप्न घेऊन फिल्मी जगतामधे आलेले युवक ‘नेपोटीज्म’ चा कशाप्रकारे शिकार होतात हे दाखवले जाईल. विजयने सांगितले की याची स्टोरी लिहण्याचे काम देखिल सुरू झाले आहे.
विजय शेखर गुप्ताने सांगितले कि, या चित्रपटातील सुशांतची मुख्य भूमिकेसाठी नवीन मुलाला कास्ट केले जाईल. आणि इतर रोल्स साठी देखील कास्टींग फाइनल करण्याचे काम चालू आहे. सुशांतच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट संप्टेबर पर्यंत पडद्यावर प्रदर्शित करण्यात येईल. तसेच १५ जुलैला या चित्रपटाचे शुटींग सुरू करण्यात येईल.