बॉलिवूडमधे गेले कित्येक वर्ष घराणेशाही चालू आहे यामुळे अनेक टॅलेंटेड कलाकारांचे करीअर विस्कळीत झाले आहे. या घराणेशाहीवर सुशांत सिह राजपुतच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत. या घराणेशाहीचा मुख्य सूत्र अभिनेता सलमान खानला मानले जात आहे. दरम्यान अभिनेता साहिल खान याने आपल्या इंस्टाग्राम अंकाऊट वरून एक फोटो शेअर करत बाॅलीवूडवर निशाणा साधला आहे.
‘साहिल खान’ हा ‘फिटनेसआयकाॅन’ पुरस्कृत आहे. त्याने देखील बाॅलीवूड मधे अनेक चित्रपटात काम केले आहे तरी देखील त्याचं करीअर फारस चालले नाही. साहिल खान ने आपल्या इंस्टाग्रामवर एक २००२ च्या ‘स्टारडस्ट’ मॅगझिनचे पेज शेअर केले त्यात साहील बरोबर सलमान आणि शाहरूख खानचा देखील फोटो आहे. हे पेज शेअर करत तो म्हणतो वरीलपैकी एका खानमुळेच माझ बाॅलीवूडमधील करीअर संपले.
हे देखील वाचा : मोठी बातमी ! सुशांत सिंग च्या जीवनावर बनणार चित्रपट विजयने केली मोठी घोषणा..
इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत साहिल म्हणतो की,
खूपच कमी लोकांबरोबर असे होते कि आपल्या पहील्याच चित्रपटानंतर भारतातील सर्वात टाॅपला असणार्या चित्रपट मॅगझिनच्या कव्हर पेज वर भारतातील दोन सर्वात मोठया सुपरस्टार्स सलमान आणि शाहरूक खान बरोबर झळकतात. आणि मला माझ्या ‘स्टाईल’ चित्रपटानंतर ती लोकप्रियता मिळालेली. पण त्यांच्यापैकी एकाला हे आवडले नव्हते.जेव्हा कि, मी नवीन होतो, त्यांचा फॅन होतो आणि कमजोर देखील होतो. तरी ते मला कित्येकदा साईड रोल साठी, टिव्ही शोझ्स साठी बोलवत राहीले आणि मग नंतर मला खूप चित्रपटांतून काढून टाकले गेले. नाव मोठे पण दर्शन छोटे ओळखा पाहू कोन ? शेवटी सुशांत सिंग राजपूतने त्याचा खरा चेहरा जगाला दाखवलाच. दुनियाचे ती लोकं नवीन टॅलेटला किती घाबरतात. जाॅन अब्राहम शिवाय आज वीस वर्षात कोणी मोठा स्टार इंडस्ट्रीमधे नाही आला कारण कोणी यायलाच देत नाही फक्त स्टार्सच्या मुलांनाच फक्त काम मिळते.