दरवर्षी पृथ्वीवरील कुठल्या ना कुठल्या भागात सूर्यग्रहण होत असते. प्रत्येक वर्षी ३ ते ४ सूर्यग्रहणे कुठे ना कुठे होतातच. यंदाचा उद्या होणारा ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ हा या वर्षातील पहीलाच ग्रहण आहे.
परंतु सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय ? बर्याच हे लोकांना माहीत नाही. पृथ्वीच्या एखाद्या विशिष्ठ स्थानावरील निरीक्षक आणि सूर्याचे बिंब याच्यांत जेव्हा कालांतरासाठी चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. एकूणच सूर्यंबिंबाला चंद्रबिंब जेव्हा झाकते टाकते तेव्हा सूर्यग्रहण होते. सूर्यग्रहण हे तीन प्रकारे होते.
खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय ? जेव्हा सूर्यबिंबाचा काहीसा भाग चंद्रबिंब झाकतो त्यावेळी खंडग्रास सूर्यग्रहण होते.
खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय ? जेव्हा चंद्रबिंब पूर्णपणे सूर्यबिंबाला झाकून घेतो तेव्हा त्यास खग्रास सूर्यग्रहण म्हणतात.
कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय ? खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी जर चंद्र आणि पृथ्वी यांच्यात खूप अंतर असेल तर, चंद्रबिंब लहान दिसते आणि त्यामुळे सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकता येत नाही. त्यामुळे सूर्याची चंद्राभोवती गोल कडा दिसते त्याला ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ म्हणतात.
हे वाचा : ‘बाॅलीवूड’मधील माझेसुद्धा करीअर यांनी संपविले- साहील खानने इंस्टाग्राम पोस्टद्वारे धरला निशाणा
ग्रहण वेध :
उद्या दि. २१ जून रोजी होणारे सूर्यग्रहण हे दिवसाच्या दुसर्या प्रहारात असल्याने शनिवार दि. २० जूनच्या रात्री सुमारा १० वाजल्यापासून दुसर्यादिवशी म्हणजेच २१ जूनला ग्रहण मोक्षापर्यंत पाळावे. वृद्ध, आजारी आणि गर्भवती महिलांनी दि. २१ जूनच्या पहाटे पावणे पाच (४.४५) पासून ग्रहणाच्या मोक्षापर्यंत पाळावे. ग्रहणाच्या वेधामधे भोजण करू नये असे शास्त्रुज्ञांनी सांगितले. ग्रहणाच्या पर्वकाळात पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कामे करू नयेत ही कामे वेधकाळात करू शकतात.उद्या होणारे सूर्यग्रहण हे पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तराखंड या उत्तरेकडील राज्यांतून कंकणाकृती दिसणार आहे आणि इतर राज्यात हे खंडग्रास अवस्थेत दिसेल.
*ग्रहणाचे राशिपरत्वे फल:* मेष, सिंह, कन्या, मकर या राशींना शुभफल. वृषभ, तुला, धनु, कुंभ या राशींना मिश्रफल.
मिथुन, कर्क, वृश्चिक, मीन या राशींना अनिष्टफल आहे.
ज्यांना अनिष्टफल आहे त्यांनी हे ग्रहण पाहू नये. *ग्रहण काल:* ग्रहणस्पर्शापासून मोक्ष पर्यंतचा काल हा पुण्यकाल (पर्वकाल) मानावा.