कोरोना वर पहीले औषध उपलब्ध! या कंपनीने बनवले…

कोरोना वर पहीले औषध उपलब्ध! या कंपनीने बनवले…

मुबंई : कोरोनाने अक्ख्या जगात थैमान घातलेले असता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता कोरोनावर औषध येईल कधी ? तर आता सगळ्यांना सुखदायक अशी खबर आलेली आहे. कोरोनावर पहीले औषध बनवलेले आहे.

‘ग्लेनमार्क’ फार्मास्युटीकल्स या मुबंईतील औषध उत्पादक कंपनीने ‘कोव्हीड-१९’ च्या साथीची लागण झालेल्या रूग्णांवर उपचारासाठी पहीले औषध बाजारात उपलब्ध केले आहे. फॅबिफ्ल्यू या ब्रँडचा फॅविपिराविर हेऔषध कंपनीने बाजारात आणले आहे.

Corona vaccine

भारताच्या मेडीसिन महानियंत्रकांनी सगळ्या चाचण्याकरून हे औषध उत्पादन करण्यास आणि बाजारात विकण्यास परवानगी दिले प्रसिद्धि पत्रकात दिलेले आहे. १०३ रूपये एक गोळी या दराने हे औषध विकले जाईल.

हे देखील वाचा : WHO ने कोरोना विषाणू बद्दल सांगितली वाईट बातमी ऐकली तर तुम्ही पण थक्क व्ह्यल..!

हे औषध मेडीकल स्टोअरमधे डाॅक्टरांच्या शिफारशीनेच उपलब्ध होईल अशी माहीती कंपनीने दिलेली आहे. शिवाय हे औषध नियमित प्रमाणात घेतले पाहीजे. पहील्या दिवशी दिवसातून दोनवेळा १८०० मिलीग्रॅम डोस नंतर ८०० मिलीग्रॅम डोस दिवसातून देनवेळा १४ व्या दिवसापर्यंत असे कंपनीने नमूद केले आहे. कमीतकमी चार दिवसांत या औषधामुळे शरीरातील विषाणूंचा संसर्ग कमी होईल तसेच लक्षणेही दूर होतील.

ग्लेनमार्क या कंपनीचे अध्यक्ष ग्लेन सलढाणा म्हणाले औषध बाजारात आणून आम्हाला खूप समाधान मिळत आहे. हे औषध सहजपणे उपलब्ध व्हावे यासाठी आरोग्य यंत्रणा आणि सरकार यांचाशी समन्वय साधण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत.

हेही वाचा : अन् पुण्याचं परगण्यासकट हळूहळू रूप पालटू लागलं.. – भाग १

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत