‘आशा’ स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्याची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी – अमित ठाकरे.

‘आशा’ स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्याची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी – अमित ठाकरे.

कोरोनाच्या या धोक्याचा काळात राबणार्या ‘आशा’ (अक्रेडीटेड सोशल हेल्थ अॅक्टिवीस्ट) स्वयंसेविका आरोग्य सेवा देतात व त्याचा बदल्यात मोबदला म्हणून त्यांना फक्त १६०० रू. मानधन मिळत असे. इतर राज्यात ‘आशा’ स्वयंसेविकांना दरमहा ४००० ते १०००० मोबदला मिळत असे. आणि महाराष्ट्रात अशी परीस्थिती असताना राबराब राबणार्या स्वयंसेविकांना फक्त १६०० रू. मिळतात. त्यांचा वेतनात वाढ करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी मा.अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहीले होते.

आज दि. २३ जून रोजी मंत्रालयात अमित ठाकरे यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर तसेच काही ‘आशा’ स्वयंसेविका यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि वेतनवाढ ची मागणी केली. तरी महाराष्ट्र सरकार यात स्वतःच योगदान म्हणून २००० रू देण्याचे ठरले. यापुढे ‘आशां’ ना दरमहा ४००० रू भेटतील याचा दोन दिवसात कॅबिनेट मधे निर्णय होई असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यानी दिले.

शिवाय कोरोनाचा संकटकाळ संपल्यावर या आरोग्य सेवकांच्या मोबदल्यात आणखी वाढ करण्याची आग्रहाची मागणी देखील अमित ठाकरे यांनी केली.

https://www.facebook.com/393573527663672/posts/1195250120829338/

‘आशा’ स्वयंसेविका आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी ‘आरोग्य सेवक’ म्हणून काम करत असत. या कोरोनाच्या संकटकाळात अनेकदा स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या राबत असत. आणि विशेषतः त्यांची ही कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यांचे काम बघता त्यांना पुरेसा असा मोबदला मिळत नाही आणि त्यांची मागणी कामाचा मोबदला वाढवून मिळावा ही योग्य आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत