सकाळी उठल्यावर चेहरा थंड पाण्याने धूवावा. कोणतेही साबण फेसवॉश न वापरता केवळ पाण्याने चेहरा धुवावा. असे नियमित केल्याने आपल्या चेहर्यावर तेज येऊ लागते आणि ते आपल्याला जाणवेल.
आपल्या माहित असेलच चेहर्यावर आइस क्यूब चोळणे फायदेशीर मानले जाते.त्याचप्रमाणे थंड पाण्याने चेहरा धुणे आपल्याला उत्साही करते.असे केल्याने त्वचा घट्ट आणि टवटवीत राहते.आपली त्वचा तरुण राहते.आपण थंड पाण्याने चेहरा धुवत असाल, तर चेहर्याचा बारिक रेषा आणि सुरकुत्या कमी होतात.
चेहरा सकाळी थंड पाण्याने धुतल्याने त्वचा उजळते तसेच तेजस्वी होते आणि रक्त प्रवाह तीव्र होतो आणि चेहरर्यावर चकाकी येते.
जर आपण स्टीम किंवा वाफ घेता ,तर त्यांनर आपल्या चेहरर्याला आवजुन धुवावे .असे केल्याने रोमछिद्र बंद होतात.