केरळमधे सचिन तेडुंलकर वर चाहत्यांचा आक्रोश पुतळ्याला काळा रंग लावण्यात आला.
सध्या संपूर्ण देशात शेतकरी आंदोलनामुळे आक्रमक रूप घेतलेल आहे. कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकर्यांनी ट्रॅक्टर व तलवारी हाती घेऊन देखील आंदोलन केले. ६ फेब्रुवारीला चक्क जाम करण्याचाही शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे.
अमेरिकन पॉपस्टार रेहानाने या प्रकरणाबाबत ट्विट करत आवाहन केले. मात्र याला विरोध करत ट्विटरबाजी सुरू झाल्या बाह्यशक्तींनी भारताच्या अंतर्गत मामल्यात दाखल घेऊ नये, असे ट्विटस अनेक सेलिब्रेटी आणि क्रिकेटर्सकडून करण्यात आले. सचिन तेंडूलकर ने पण अशा प्रकारे ट्विट केले होते. भारत एकजूट आहे, असे ट्विटदेखील करण्यात आले.
मात्र तेंडुलकर च्या या ट्विटनंतर चाहत्यांनी त्याला नापंसद करण्यास सुरूवात केली. केरळमधे त्याच्या प्रतिमा बनवून त्या प्रतिमेवर चेहर्यावर काळा रंगाचा कलर लावण्यात आला. अशा प्रकारे सचिनला चाहत्यांचा रोषाला सामोरे जावे लागत आहे.