मुबंई महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य खात्यावर जास्त तरतूद- सविस्तर वाचा

मुबंई महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य खात्यावर जास्त तरतूद- सविस्तर वाचा

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि जागतिक दर्जाचे मुंबई शहर महापालिकेचा ३९ हजार ०३८.८३ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी २०२१ आणि २०२२ चं वार्षिक बजेट जाहीर करण्यात आले. या बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रासाठी २०२१-२२ च्या सुधारित अर्थसंकल्पात ७८०.६९ कोटी आणि २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात १२०६.१४ कोटी इतकी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यापैकी ८२२.७२ कोटींची तरतूद दुरुस्तीच्या कामांसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. मुबंई महापालिका आयुक्त इकबाल सिंग यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधन याच्यांसमोर सादर केलेल्या अर्थ संकल्पात आरोग्य विभागासाठी पुढील तरतूदी केलेल्या आहेत-

हेदेखील वाचा -जुन्याच प्रकल्पांना पहीले प्राधान्य देण्यात येईल-महापौर

BMC Budget २०२१ मध्ये आरोग्य क्षेत्रातील भारतीय नर्सिंग परिषदेच्या निर्देशानुसार, महापालिकेचे सर्व नर्सिंग स्कुलचे नर्सिंग कॉलेजमध्ये परावर्तित करण्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

.सर्व वैद्यकीय महाविद्यालये व प्रमुख रुग्णालयांमधील यंत्रसामुग्री करण्यासाठी ९६ कोटी रूपयांंची तरतूद

सायन, केईएम नायर रुग्णालयात सिटी स्कॅन सुविधेसाठी ८ ते १० कोटी रूपये खर्चाची तरतूद

क्षयरोग, एड्स, डेंग्यू, लेप्टो म, मलेरीया यासारख्या संसर्गजन्य रोगांसाठी २०३० वर्षांपर्यंत १०० टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट

ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, दिव्यांग व्यक्तींना घरातच आरोग्य सेवा देण्यासाठी ओपीडी ऑन व्हील योजनेअंतर्गत शहर, पूर्व, पशचिम उपनगरांमध्ये मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देणार

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयक चाचण्या घरातच करता याव्यात यासाठी आयुर्वेद औषधपद्धतीचा वापर करणार यासाठी ५ कोटींची तरतूद

संसर्गजन्य रोगांचा सामना करण्यासाठी कायमस्वरूपी कस्तुरबा रुग्णालयाची क्षमता वाढाविण्यासाठी नवीन इमारत बांधण्यास परवानगी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत