मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला संबोधताना सांगितले की, कोरोना मुळे आपण कचाट्या सापडलो आहोत. जून ३० तारखेपर्यंत लाॅकडाऊन वाढवण्यात आले होते. आता आपल्याला कोरोनाशी सामना करायचा आहे.
राज्यात ३० तारखेनंतर देखील लाॅकडाऊन चालू राहील. पण लाॅकडाऊन मधे काही प्रमाणात सूट देण्यात येईल. पूर्णपणे लाॅकडाऊन हटलेले नाही. महाराष्ट्राला लाॅकडाऊन हा शब्द विसरून ‘मिशीन बिगन अगेन’ यावर लक्ष दिले पाहीजे. म्हणूनच महाराष्ट्र जपून हळूवार पाऊल टाकत आहे.
अनावश्यक गर्दी टाळावी. गरज नसल्यास बाहेर पडू नये. आजपासून न्हाव्यांना परवानगी देण्यात आलेली आहे तसेच ऑफिसेस देखील काही प्रमाणात चालू करण्यात आलेले आहेत. लाॅकडाऊन संपला असा गैरसमज करून घेऊ नका.
मुख्यमंत्र्यानी सगळ्या नागरीकांचे आभार देखील मानलेले आहेत. आपले पारंपारीक सण घरी राहून साजरे केल्याने सामाजिक भान ठेवल्याबद्दल आभार मानले. शिवाय सध्याच्या परीस्थिती मुळे पंढरपूरची वारी देखील रद्द करण्यात आली आहे. सुमारे ८०० वर्षापासून चालत आलेली ही वारी आहे. आषाढी एकादशीला ही वारी असते. मुख्यमंत्री स्वतः पंढरपूरला जाऊन नागरीकांच्या वतीने त्यांचा प्रतिधीनी म्हणून देवाला साकडं घालणार आहे.