मुबंईत कोरोनाग्रस्त रूग्णांचा संख्येत झपाट्याने वाढ पुन्हा लाॅकडाऊन होण्याची शक्यता.

मुबंईत कोरोनाग्रस्त रूग्णांचा संख्येत झपाट्याने वाढ पुन्हा लाॅकडाऊन होण्याची शक्यता.

मुबंईत कोरोनाग्रस्त रूग्णांचा संख्येत झपाट्याने वाढ. पुन्हा लाॅकडाऊन होण्याची शक्यता.

मुबंईत कोरोनाग्रस्त रूग्णांचा संख्येत झपाट्याने वाढ. पुन्हा लाॅकडाऊन होण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली.

मुंबई १० जून : अडीच महिन्यांनंतर मुंबईतले व्यवहार पुन्हा हळूहळू टप्पेवारीनुसार सुरू करण्यात आले आहेत. परंतु त्याचा परीणाम वाईट होत आहे आवश्यक नसताना मुबंईत जास्त गर्दी होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. गरज नसताना माणसं गर्दी करत राहिले तर लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेली सुट परत मागे घेऊन पुन्हा लाॅकडाऊन करावा लागेल असे मुख्यमंत्री यांनी सूचना केली.

८ जूनपासून अनलाॅक १.० सुरू झाले आहे. त्यामुळे सोशल डिस्टसिंगच उल्लंघन होत असल्याच चित्र दिसत आहे. पहील्यासारखे वातावरण दिसत आहे. सर्वत्र माणसांची आणि वाहनांचीदेखील गर्दी होत आहे. शिवाय जागोजागी ट्रॅफीक जाम ची समस्या निर्माण होत आहे.

हेदेखिल वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आणि सोनू सुद याने मातोश्रीवर घेतली भेट.

या सगळ्या गोष्टिंचा परीणाम कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुबंई ही कोरोना रूग्णांसाठी हाॅटस्पाॅट ठरली असल्यामुळे जास्त चिंता लागलेली आहे.

महाराष्ट्र राज्यात एकूण रुग्णांची संख्या ९४०४१ वर पोचली आहे व आज ३२५४ नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच १८७९ रूग्णांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे. मुंबईतील एकूण रूग्णांची संख्या ५२६६७ वर पोचली आहे. आज १५६७ नवे रूग्ण सापडले.

महाराष्ट्र राज्यात आज एकूण आज १४९ जणांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोनामुळे एकूण ३४३८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आज एकूण ९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत