चमोली (उत्तराखंड) :
उत्तराखंडात मोठी दुर्घटना झाली आहे. जोशीमठ येथे हिमकडा (ग्लेशिअर) तुटल्याने महापूर आलेला आहे.
हिमकडा दुर्घटनेमुळे श्रीनगर, ऋषिकेश आणि हरिद्वार व इतर ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या पुरामधे १५० जण अडकल्याची माहीती मिळालेली आहे. या पुरामुळे ऋषीगंगा वीज प्रकल्पाचेही फार नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. (Rishiganga Power Project has been damaged due breach of a glacier in Tapovan area).
राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत म्हणाले की, चमोलीच्या रिनी गावात ऋषीगंगा प्रकल्पाचे पाण्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.
नदीत पाण्याची पातळी अचानक वाढली तर अलकनंदा परिसरात पूर येण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात लोकांना अलर्ट केले गेले आहे. तसेच किनारपट्टीच्या भागातून नागरिकांना सुरक्षितस्थळी रवाना करण्यात आले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वांना विनंती केली की कोणताही जुना व्हिडिओ शेअर करुन घाबरू नये. आलेल्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी आवश्यक पावले उचलली गेली आहेत आपण संयम ठेवण्याची आवश्यक्तता आहे.