नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या परीक्षे वर अजूनही विचार चालूच होते. परीक्षा नक्की होणार की नाही असा प्रश्न विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्या देखील मनात होता. त्यावर आता केंद्रीय गृहमंत्रालयाने विद्यापीठांना आणि शैक्षणिक संस्थांना परीक्षा घेण्यास परवानगी केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना पत्राद्वारे दिली.
स्टॅन्डर्ड आॅपरेटिंग प्रोसिजर अंतर्गत तसेच यूजीसी च्या गाईडलाईन्स नुसार या परीक्षी घेण्यास सांगितलेले आहे. शिवाय यूजीसी च्या गाईडलाईन्स मधे ही अंतिम वर्षाच्या परीक्षा कशाही परीस्थितीत घेण्याचा उल्लेख देखील केलेला आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव बघता काहीं दिवसांपूर्वीच अंतिम वर्षाच्या प्रोफेशनल व नाॅनप्रोफेशनल परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर केल्या होत्या. परंतु आता केंद्र सरकारनेच परीक्षा घेण्यास सांगितले आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाने पत्राद्वारे केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना परवानगी दिल्याने या परीक्षा घेणे भागच आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या एसओपी नुसारच या परीक्षा घेण्यात येतील.