इयत्ता दहावी साठी बोर्ड नाही ? खोटा मेसेज होतोय वायरल

इयत्ता दहावी साठी बोर्ड नाही ? खोटा मेसेज होतोय वायरल

नवी दिल्ली – आत्ताच आलेल्या नवीन शिक्षण धोरणानुसार इयत्ता १० वी च्या बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आल्या असून फक्त इयत्ता १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत, असा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सरकारकने त्वरीत यामधे लक्ष घालून हा मेसेज खोटा असल्याचे सांगून यावर दुर्लक्ष करण्यास सांगितले आहे.

सध्या व्हाॅस्टसअपवर अनेक मेसेंज झटकन व्हायरल होत असतात. त्यामुळे तो मेसेज खरा आहे की खोटा याचेही भान ठेवले जात नाही. असाच एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तो पुढीलप्रमाणे आहे.

‘कॅबिनेटने नवीन शिक्षण धोरणाला हिरवा झेंडा दाखवला आहे.
तब्बल ३४ वर्षानंतर शिक्षण धोरणात बदल करण्यात आला आहे. नवीन शिक्षण धोरणातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे..

केवळ इयत्ता १२ वी साठीच बोर्ड परीक्षा असेल, इयत्ता दहावीचे बोर्ड रद्द करण्यात आले आहे. एमफील देखील बंद करण्यात आले आहे.

आता केवळ बारावीच्या विद्यार्थ्यांनाच बोर्डाची परीक्षा द्यावी लागेल. यापुर्वी दहावीच्या विद्यार्थ्यांनाही बोर्डाची परीक्षा देणे बंधनकारक होते.

आदेशानुसार – (माननीय शिक्षण मंत्री, भारत सरकार)’
हा मेसेज व्हायरल होत आहे. यावर आपण दुर्लक्ष करावे. तसेच असा मेसेज तुम्ही पुढे पाढवू नका. केंद्र सरकारने हो माहीती पूर्णपणे खोटी असल्याचे देखील सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत