महाराष्ट्रातील जिल्हापरीषदेच्या शिक्षकाला ग्लोबल टीचर प्राईज २०२० हा ७ कोटींचा पुरस्कार मिळालेला आहे. जागतिक दर्जाचा हा पुरस्कार युएनईएससीओ आणि लंडन यांच्या वारकी फाऊंडेशनतर्फे देण्यात येतो. सोलापुरातील परतेवाडी शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे.लंडनमधील नेचरल हिस्टरी म्युझियम मधे झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी ही अधिकृत घोषणा केली.ग्लोबल टीचर प्राईज हा पुरस्कार मिळवणारे रणजितसिंह डिसले हे पहीलेच भारतीय शिक्षक आहेत. रणजितसिंह यांनी क्यूर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्राबरोबरच देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेली आहे. या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जगातील १४० देशांतील १३००० हून जास्त शिक्षकांमधून रणजितसिंह यांनी हा पुरसाकार मिळवला आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी महत्वाची कामगिरी पार पाडली आहे. ८० पेक्षा जास्त देशांमधील विद्यांर्थ्यांना ते आॅनलाईन विज्ञानाचे धडे देतात.शिवाय रणजितसिंह डिसले यांनी पुरस्काराच्या एकूण रकमेपैंकी ५० टक्के रक्कम ही अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे जाहीर केले. त्यामुळे ९ देशांमधील १००० मुलांना गुणवत्त्पूर्ण शिक्षण दिले जाईल. रणजितसिंह डिसले यांना मिळालेली रक्कम ते टीचर इन्होवेशन फंडाकरता वापरणार आहेत त्यामुळे शिक्षकांसाठी नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल असे सांगितले.तसेच रणजितसिंह डिसले यांना लोकमतने २०१९ साली महाराष्ट्रीयन आॅफ द यिअर पुरस्कार दिला होता.