सोन्याचा दर सध्या पन्नास हजाराच्या वर आहे. सोनं खरेदी करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. सॉवरेन गोल्ड या सरकारी योजनेअंतर्गत सर्वांना स्वस्तात सोनं खरेदी करता येणार आहे. साॅवरेन गोल्ड बाँड या सरकारी स्किमच्या अंतर्गत अकराव्या सिरीज च सबस्किप्शन १ फेब्रुबारी पासून सुरू होत आहे. मागील काही वर्षात सोन्याचे भाव खूपच वाढले आहेत, ते पाहता सोनं ही एक उत्तम गुंतवणूक देखील ठरते.
१ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारीदरम्यान हे सबस्क्रिप्शन सुरू राहणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं या योजनेअंतर्गत सोनं प्रति ग्रॅम ४९१२ रुपये या दराने खरेदी करता येणार आहे.
सध्या सोन्यावर इम्पोर्ट ड्युटी आणि जीएसटी लागत असल्यानं सोन्याचे भाव खुपच वाढलेत. इम्पोर्ट ड्युटी १२.५ टक्के एवढी आणि जीएसटी ३ टक्के एवढी आहे. सोन्याची इम्पोर्ट ड्युटी आणि जीएसटी कमी करण्याबाबतची मागणी व्यापार्यांडून खूप आधीपासून करण्यात येत आहे. साॅर्वजेन जोल्ड बाँड स्किम मध्ये ऑनलाईन गुंतवणूक करुन डिजिटल पेमेंट केल्यावर प्रत्येक १ ग्रॅम गुंतवणुकीसाठी ५० रुपयांची सूट मिळेल. याचाच अर्थ तुम्ही एक तोळा सोने खरेदी केल्यास तुम्हाला एकूण ५०० रुपयांची सूट मिळेल.
सध्या सोनं पन्नास हजाराच्या वर गेल आहे मात्र या योजनेअंतर्गत ४९ हजार १२० रूपये या दराने खरेदी करता येणार आहे.
सोन्याच्या दुकानात जाऊन खरेदी केली, तर ग्राहकांना कुठलीही सूट मिळत नाही. मात्र सरकारी बॉंडमध्ये गुंतवणूक केल्यास सोन्याच्या भावात सूट मिळणार आहे.
या योजनेत तुम्ही कमीत कमी १ ग्रॅम तर जास्तीत जास्त ४०० ग्रॅम सोन्याचे बॉंड्स खरेदी करू शकता.